अमोल गावंडे
चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजय गिरी असं त्यांचे नाव आहे. या घटनेनंतर बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अजय गिरी हे आज कामावर नव्हते. पण त्यांना पोलिस विभागाने सुरक्षेसाठी बंदूक दिली होती. ती त्यांच्याकडेच होती. त्याच बंदूकीने त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यात आले.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्वेता महाहे या भाजपच्या चिखलीच्या आमदार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकाने त्यांना अंगरक्षक देवू केला होता. अजय गिरी हे त्यांच्या संरक्षणासाठी होते. नेहमी ते श्वेता महाले यांच्या बरोबरच वावरत होते. अंगरक्षक म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्यांची नुकतीच मुंबईतून बुलढाण्यात बदली झाली होती. आज बुधवारी ते कर्तव्यावर गेल नाहीत. ते बुलढाण्याच्या पोलिस वसाहती मध्ये राहत होते. या घरामध्येच त्यांनी स्वत:वर गोळी झाडली.
ट्रेंडिंग बातमी - 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'
ही गोळी त्यांनी आपल्या डोक्या झाडली. ही घटना समजल्यानंतर एकच धावाधाव झाली. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयातून हलवण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.अजय गिरी यांनी आत्महत्या केल्याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अधिक तपास आता पोलिस करत आहेत. त्यांना आमदार महालेंच्या सुरक्षेसाठी जी बंदूक देण्यात आली होती, त्यातूनच त्यांनीआपल्यावर गोळी झाडली आहे.