BMW Hit and Run Case : मुंबईतल्या वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात क्राईम ब्रँचच्या हाती मोठा सुगावा लागला आहे. ही दुर्घटना झाली त्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी मिहीरनं त्याच्या गर्लफ्रेंडला 40 वेळीा कॉल केला होता. या प्रकरणात क्राईम ब्रँच मिहीरच्या गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर मिहीर वांद्रेला गेला. तिथं गर्लफ्रेंडला भेटल्यानंतर तो रिक्षानं गोरेगावला गेला. मिहीरनं गर्लफ्रेंडच्या घरी दोन तास आराम केला. त्यानंतर तो बहिणीसोबत गेला.
क्राईम ब्रँच मिहीरच्या गर्लफ्रेंडची चौकशी करु शकते. मिहीर नशेत होता का? हे क्राईम ब्रँच त्याच्या गर्लफ्रेंडकडून जाणून घेईल. त्याचबरोबर या प्रकरणातील आणखी काही प्रश्नही गर्लफ्रेंडला विचारले जातील. या चौकशीतून मिहीरचं नेमकं सत्य समोर येण्यास मदत होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
7 दिवसांची पोलीस कोठडी
मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याला मंगळवारी (9 जुलै) विरारमधून अटक करण्यात आली होती. आरोपीनं कारची नंबर प्लेट कुठं सोडली याचा तपास करायचा आहे. त्याचबरोबर आरोपीनं कुणाला संपर्क केला. त्याला कुणी मदत केली हे देखील शोधायचं असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं कारची नंबर प्लेट फेकून दिली होती. त्यामुळे या अपघातामध्ये वापरण्यात आलेली कार कुणाच्या नावावर होती? याचा तपास पोलीस करत आहेत. मिहीर अटक टाळण्यासाठी सुमारे 60 तास वेगवेगळ्या भागात फिरत होता.
( नक्की वाचा : 'तुमच्या लाडक्या बहिणीचा मृत्यू झालाय', BMW हिट अँड रन प्रकरणातील पीडित पतीचा टाहो )
अपघातानंतर गाठलं गर्लफ्रेंडचं घर
मिहीर शहानं दिलेल्या कबुलीनुसार, 'तो अपघातानंतर खूप घाबरला होता. त्याला घरचे रागवतील अशी भीती होती. त्यामुळे तो वडील वांद्रेमध्ये पोहोचण्यापूर्वी तिथून निघून गेला. पण, तो घरी न जाता गोरेगावला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला.
सत्तारुढ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते राजेश शाह यांचा मिहीर मुलगा आहे. तो रविवारी (7 जुलै) पहाटे दारुच्या नशेत BMW चालवत होता असा आरोप आहे. त्यावेळी त्याच्या कारनं स्कुटरला धडक दिली. त्यामध्ये कावेरी नवखा (45) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती प्रदीप नखवा (50) जखमी झाले.