सुनील महाडेश्वर, प्रतिनिधी
Borivali Railway station incident : मुंबई लोकलमध्ये विनातिकीत प्रवास करणाऱ्या प्रवाशानं तिकीट तपासणीसाला (TC) बेदम मारहाण केली आहे. तसंच त्यानं रेल्वेच्या कार्यालयातही तोडफोड केलीय मुंबईच्या बोरीवली स्टेशनवर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
विरार फास्ट लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासणीस शमशेर इब्राहिम नियमित तिकीट तपासणी करत होते. त्यावेळी तपासणीच्या दरम्यान दादरहून विरारला प्रथम श्रेणीच्या (फर्स्ट क्लास) डब्यात प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशकडे दुसऱ्या श्रेणीचं (सेकंड क्लास) तिकीट असल्याचं त्यांना आढळलं. तर एकाकडं अंधेरी-बोरीवली दरम्यानच्या प्रवासाचे तिकीट नव्हते.
पुढील कारवाईसाठी या प्रवाशांना बोरिवली स्टेशनवर उतरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, प्रवाशांना औपचारिक हाताळणीसाठी टीटीई/टीसी कार्यालयात नेण्यात आले. त्यावेळी तिकीट तपासणीसाच्या कारवाईमुळे एक प्रवासी आक्रमक आणि हिंसक झाला. त्याने रेल्वे मालमत्तेचं नुकसान केलं. अन्य वस्तूंची तोडफोड केली. या सर्व तोडफोडीच्या दरम्यान रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशाला दुखापत झाली आहे.
( नक्की वाचा : Pune Dargah Controversy : पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे आक्रमक आंदोलन, अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी अल्टीमेटम )
दोघांनाही तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी पाठवण्यात आले आणि नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपीकडे सोपवण्यात आले आहे .