स्वानंद पाटील
मुलींवरील अत्याचाराच्या घटना राज्यात कोणत्या ना कोणत्या भागात होत आहेत. त्यामुळे राज्यात एक असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत बीडमधली केजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यांतर तिसरीत शिकणारा एक मुलगा घरी जात होता. वाटेत त्याला किराणामालाचे दुकान दिसले. दुकाना बाजूला तो उभा होता. त्याच वेळी दुकानदाराला त्याने चॉकलेट चोरल्याचा संशय आला. त्यानंतर दुकानदाराने त्याच्या बरोबर जे केले त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीड मधील केज तालुक्यात शाळा सुटल्यानंतर एक आठ वर्षाचा मुलगा घरी चालला होता. त्या वेळी किराणा दुकानातील चॉकलेट चोरल्याचा त्या मुलावर संशय घेण्यात आला. तो मुलगा इयत्ता तिसरीत शिकतो. या संशयातून दुकानदाराने त्या लहान मुलाला कपड्याने झाडाला बांधून ठेवले. तो मुलगा आपल्याला सोडून द्या असे सांगत होता. पण दुकानदाराने त्याचे काही एक ऐकले नाही.
येवला येथे जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणारा हा विद्यार्थी आहे. मध्यंतराच्या सुट्टीत घरी येत असताना त्याला गावातील एका किराण दुकानदार महिलेने घरासमोर असलेल्या झाडाला बांधले. दुपारच्या सुट्टीत मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने घरा बाहेर पडत त्याची चौकशी केली. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला शोधत त्याची आई त्या किराणामालाच्या दुकानापर्यंत पोहोचली. त्यावेळी आपल्या मुलाला झाडाला बांधून ठेवल्याचे तिने पाहीले. त्यानंतर त्या मुलाची सुटका झाली.
ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे
हा प्रकार पाहील्यानंतर त्या मुलाच्या आईने संताप व्यक्त केला. केवळ संशयावरून लहान मुलाला झालाला बांधणे किती योग्य आहे असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी मुलासह केज पोलीस ठाणे गाठले. झालेला सर्व प्रकार पोलीसांना सांगितला. त्यानंतर कविता जोगदंड, पांडुरंग जोगदंड आणि गोपाळ जोगदंड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.