वरमाला नाकारल्याने वऱ्हाडींचा गोंधळ, वधू पक्षातील लोकांना लाठी-काठीने मारहाण

देशभरात होणाऱ्या जवळपास प्रत्येक लग्नात तुम्हाला वरमालाची पद्धत पाहायला मिळते. काही कुटुंबांमध्ये ही प्रथा परंपरेचा भाग नाही आणि ती केली जात नाही. मात्र, काही वऱ्हाडींना हे पसंत आले नाही आणि त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

देशभरात होणाऱ्या जवळपास प्रत्येक लग्नात तुम्हाला वरमालाची पद्धत पाहायला मिळते. काही कुटुंबांमध्ये ही प्रथा परंपरेचा भाग नाही आणि ती केली जात नाही. मात्र, काही वऱ्हाडींना हे पसंत आले नाही आणि त्यांनी जोरदार गोंधळ घातला.  बिहारच्या वैशाली जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. इथं वऱ्हाडींनी वधू पक्षाच्या लोकांसोबत जोरदार मारामारी केली. या मारामारीनंतर काही लोकांना समस्तीपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक वधू पक्षाच्या लोकांना मारहाण करताना दिसत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वैशालीच्या पातेपूर ब्लॉकमधील बलिगाव पोलिस स्टेशन हद्दीतील चकमीर वॉकी गावात समस्तीपूरच्या मोरवा ब्लॉकमधील आनंदपूर मोरवा येथून वरात आली होती. नाच-गाणे झाल्यानंतर वऱ्हाडींना स्वागतासाठी बसवले असता, त्यापैकी वराचे काही मित्र जबरदस्तीने वरमाला घालण्याचा हट्ट करू लागले. वधू पक्षाच्या लोकांनी समजावून सांगितले की, आमच्याकडं हा विधी नाही. पण, त्यांचे समाधान झाले नाही.

Advertisement

वऱ्हाडींची वधू पक्षाला धमकी

वधू पक्षाचे संतोष राय यांनी सांगितले की, तिलक समारंभादरम्यानच मुलाच्या कुटुंबाला याबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र, काही वऱ्हाडींनी सांगितले की, वरमाला घालण्यात आली तरच लग्न होईल, अन्यथा आम्ही मुलाला घेऊन निघून जाऊ.

त्यांनी सांगितले की, खूप समजावल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली. वऱ्हाडींना जेवण देण्यात आले आणि लग्नही पार पडले.

( नक्की वाचा :  बायकोचं मुंडकं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला! थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाचं काय आहे कारण? )

वधू पक्षाच्या लोकांना मारहाण

त्यांनी सांगितले की, नंतर जेव्हा वधू तिच्या भावासोबत आनंदपूर मोरवाला म्हणजे मुलीच्या सासरवाडीत पोहोचली तेव्हा काही वऱ्हाडी त्याच्यासोबत जोरदार मारामारी केली. त्यांनी मुलीच्या भावाला मारहाण करून रक्तबंबाळ केले.

मुलीच्या भावानं त्यांच्या कुटुंबातील फोनवर माहिती दिली, त्यानंतर मुलीचे वडील आणि इतर अनेक जणांनी मुलीच्या सासुरवाडीत पोहोचले. तर त्यानंतर मुलाकडच्या लोकांनी त्या सर्वांना मारहाण केली. ते पुढे म्हणाले की, वधू पक्षाच्या लोकांना मोटरसायकलवरून खाली उतरण्याचीही संधी दिली नाहीय त्यांच्यावर लाठी-दगडानी हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांमध्ये महिला-पुरुष सर्वजण सहभागी होते. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींवर समस्तीपूरच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

bride-side-guests-attacked-by-baraatis-with-sticks-over-garland-ceremony


Topics mentioned in this article