Buldhana News: जळगावला निघाले पण रस्त्यातच जोडपं रहस्यमयरीत्या गायब झाले, बेपत्ता होण्यामागचं गुढ वाढले?

मग त्यांनी पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांच्या फोनवरही कॉल केला. पण त्यांचा ही फोन बंद येत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
बुलढाणा:

अमोल सराफ 

पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम  येथील एका खाजगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते मुळचे जळगावचे आहे. त्यांच्या कुटुंबात जळगावमध्ये लग्नकार्य होतं. त्यामुळे पद्मसिंह पाटील हे आपली पत्नी नम्रता यांच्या सोबत कारने जळगावच्या दिशेने निघाले होते. पाचोरा इथं हा लग्न सोहळा होणार होता. त्यासाठी 27 नोव्हेंबरला ते सकाळी सहा वाजता तेलंगणा येथून जळगावसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चुलत भाऊ संदीप पाटील याच्या सोबत बोलणे झाले होते. शिवाय रात्री दहा पर्यंत ते पोहोचतील असेही त्यांनी त्यांना सांगितलं. 

त्यानुसार संदीप पाटील यांनी संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान पद्मसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा कॉल केला. त्यानुसार आपण व्यवस्थित आहोत. शिवाय रात्री दहा पर्यंत जळगावमध्ये पोहोचू असंही त्यांनी आपल्या चुलत भावाला सांगितले. त्यानुसार सर्व जण त्यांच्या येण्याची वाट पाहात होते. विशेष म्हणजे त्यांनी या लग्नासाठी आठ दिवस सुट्टी घेतली होती. रात्र दहा वाजले तरी पद्मसिंह हे जळगावमध्ये पोहोचलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावाने त्यांना कॉल केला. पण त्यांचा फोन बंद येत होता. वारंवार फोन केल्यानंतर ही फोन बंद येत होता. 

Advertisement

नक्की वाचा - Ratnagiri News: नगराध्यक्षपदासाठी माजी आमदाराचं डोक्याला बाशिंग, थेट दंड थोपटत मैदानात शड्डू

मग त्यांनी पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांच्या फोनवरही कॉल केला. पण त्यांचा ही फोन बंद येत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घाबरून गेलं होतं. सतत फोन करून ही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. हे  दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत या दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान त्यांची मुलगी यावेळी त्यांच्या सोबत नव्हती. ती काही कारणाने तेलंगणातच त्यांच्या घरी थांबली होती.  

नक्की वाचा - CIDCO News: सिडकोच्या घरांना प्रतिसाद कसा? एका आठवड्यात किती अर्ज आले?

त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं आहे. मात्र त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली आहे. यानुसार आता पोलिसांचा पथक या दांपत्याच्या शोधासाठी निघालेला आहे. अचानक बेपत्ता झालेल्या दांपत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशय ही व्यक्त होत आहे. या मार्गावर कोणता अपघातही झाले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे दाम्पत्य गुढ पद्धतीने कुठे गायब झालं याची चर्चा सर्वत्र आहे.