छत्तीसगडच्या बस्तरमधील पत्रकार मुकेश चंद्राकर हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांची सर्वत्र शोधाशोध झाली. त्यांच्या भावाने पोलिसात तक्रारही दाखल केली. चंद्राकर हे बक्सर सारख्या नक्षल प्रभावीत भागात पत्रकारीता करत होते. त्यांचा या भागात चांगला दबदबा होता. NDTV साठी ते मुक्त पत्रकारीता करत होते. त्यांनी नक्षलभागाच्या समस्या असो की समाजपयोगी कार्य असो, सरकारी कामात घोटाळा असो त्यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे या भागात ते चांगलेच परिचित होते. त्यात ते अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसात याबाबत तक्रार दाखल झाली. त्यानंतर मुकेश चंद्राकर यांचा शोध सुरू झाला. त्यांच्या फोनचे लोकेशन तपासण्यात आले. 1 जानेवारीला गायब झालेले पत्रकार मुकेश यांचा शोध अखेर 3 जानेवारीला लागला. ज्या अवस्थेत ते भेटले त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मुकेश हे जिवंत नाही तर त्यांचा मृतदेह मिळाला. तो ही एका सेप्टिक टँकमध्ये टाकण्यात आला होता. ज्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. तो भ्रष्टाचार मुकेश यांनी उघड केला होता. त्याच रस्त्याच्या बांधकाम ठिकाणी असलेल्या सेप्टिक टँकमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मुकेश हे 33 वर्षाचे होते.
रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार उघड केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. बस्तर सारख्या नक्षली भागात काम करताना त्यांनी जीवाची परवा नकरता वृत्तांकन केले आहे. नक्षली भागातील प्रश्न त्यांनी सरकार समोर मांडले होते. एप्रिल 2021 मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. त्यावेळी त्यांनe सोडवण्यात मुकेश यांची भूमीका ही महत्वाची होती. त्यांच्या या कामगिरीचे सर्वांनीच कौतूक केलं होतं.
मुकेश यांनी बिजापूर येथील रस्ते कामात घोटाळा झाल्याचे उघड केले होते. गंगापूर ते नेलशनार पर्यंतच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले होते. या रस्त्यासाठी 120 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. 52 किलोमिटरचा हा रस्ता होता. त्यातील 40 किलोमिटरचा रस्ता पूर्ण झाला होता. मात्र या रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य होते. यात घोटाळा झाल्याची बातमी मुकेश यांनी केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. या रागातूनच ठेकेदाराने ही हत्या केल्याची चर्चा सुरू आहे.