Congress MLA : 'पप्पी' अडकला! काँग्रेस आमदाराला अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक; 12 कोटींची रोकड जप्त

Congress MLA K C Veerendra Puppy Arrested : सक्तवसुली संचालनालयाने (ED) कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र 'पप्पी' यांना एका मोठ्या अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Congress MLA : देशभरात दोन दिवस चाललेल्या तपास मोहिमेनंतर ही कारवाई करण्यात आली.
मुंबई:

Congress MLA K C Veerendra Puppy Arrested : सक्तवसुली संचालनालयाने (ED) कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र 'पप्पी' यांना एका मोठ्या अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक केली आहे. देशभरात दोन दिवस चाललेल्या तपास मोहिमेनंतर ही कारवाई करण्यात आली. तपासामध्ये दुबईतील आंतरराष्ट्रीय कॅसिनो आणि गेमिंग ऑपरेशन्सशी संबंधित एक मोठे अवैध सट्टेबाजी नेटवर्क उघड झाले आहे.

देशभरात छापे

22 आणि 23 ऑगस्ट रोजी सिक्कीम, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यासह अनेक राज्यांमध्ये ED ने छापे टाकले. गोव्यातील Puppy's Casino Gold, Ocean Rivers Casino, Puppy's Casino Pride, Ocean 7 Casino आणि Big Daddy Casino या पाच कॅसिनोंवर तपास यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रित केले होते.

( नक्की वाचा : Online Gaming Bill 2025: Dream11, MPL सह सर्वच 'पेड गेम्स' बंद, तुमच्या पैशांचं काय होणार? )
 

वेबसाइट्स आणि कंपन्या

या प्रकरणात तपास यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, आमदार वीरेंद्र 'King567' आणि 'Raja567' यांसारख्या अनेक सट्टेबाजीच्या वेबसाइट्स चालवत होते. तर, त्यांचे भाऊ के. सी. थिप्पेस्वामी दुबईमध्ये कॉल सेंटर सेवा आणि गेमिंग ऑपरेशन्सशी संबंधित तीन कंपन्या चालवत होते.

छाप्यामध्ये काय मिळाले?

या छाप्यात ED ने 12 कोटी रुपयांची रोकड, 6 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सुमारे 10 किलो चांदीचे दागिने आणि 0003 हा एकच व्हीआयपी नंबर असलेल्या तीन आलिशान कार जप्त केल्या आहेत. याशिवाय, MGM, Bellagio, Metropolitan, Marina, Casino Jewel, ताज, हयात आणि द लीला यांसारख्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कॅसिनो आणि हॉटेल्सचे सदस्यत्व कार्ड्स, तसेच अनेक उच्च मूल्याची क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सही मिळाली आहेत.

Advertisement

बँक खाती गोठवली

तपास यंत्रणेला रोख आणि निधीच्या 'कॉम्प्लेक्स लेयरिंग' कडे निर्देश करणारी कागदपत्रे आणि गंगटोकमध्ये जमिनीवरील कॅसिनो भाड्याने घेण्याच्या प्रयत्नांचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणात वीरेंद्र यांचे भाऊ के. सी. नागराज आणि पुतण्या पृथ्वी एन. राज यांच्याशी संबंधित 17 बँक खाती, दोन लॉकर गोठवण्यात आले असून, मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

50 वर्षीय काँग्रेस आमदाराला मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यामध्ये त्याला बंगळूरु कोर्टात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.