विवाहबाह्य संबंधातून पतीनं पत्नीची किंवा पत्नीचं पतीची हत्या केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा उघड झाल्या आहेत. पण, नुकत्यात उघड झालेल्या एका धक्कादायक घटनेत 45 वर्षांच्या विवाहित महिलेनं पतीसोबत मिळून त्याच्या 25 वर्षांच्या प्रियकराची स्क्रूड्रायव्हरनं हत्या केली आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात एका 45 वर्षीय व्यक्तीचा छळ करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जोडप्याला ताब्यात घेतले आहे. या जोडप्यानं स्क्रूड्रायव्हर (screwdriver) आणि प्लायर (pliers) यांसारख्या हत्यारांनी ही हत्या केल्याची माहिती आहे, पीडित अनीशच्या कुटुंबीयांनी 7 लाख रुपयांच्या कर्जावरून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केलाय. तर पोलिसांनी विवाहबाह्य संबंध हे या भयंकर गुन्ह्यामागचे कारण असल्याचे सांगितले आहे.
अनीशचे वडील मुस्तकीम यांनी सांगितले की, अनीशची निर्घृण हत्या करण्यात आली. "त्यांनी त्याचे हात-पाय तोडले, त्याला विवस्त्र केले. त्याला घरी बोलावले आणि त्याची हत्या केली.'' मुस्तकीम यांनी हत्येचं कारण देताना सांगितलं की, अनीशचे लग्न ठरले होते आणि काही वर्षांपूर्वी शेजाऱ्याला दिलेल्या 7 लाख रुपयांची परतफेड करण्यास सांगण्यासाठी तो त्याच्या घरी गेला होता. "त्यांनी माझ्या मुलाची इतकी निर्घृण हत्या केली की त्याचे वर्णनही करता येणार नाही. ''
कुटुंबीयांनी सांगितले की, जखमी अनीश कसाबसा घरातून पळून आपल्या घरी पोहोचला, जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला.
( नक्की वाचा : Love Story: नवरा गंगास्नानासाठी गेला तेवढ्यात बायको प्रियकरासोबत झाली फुर्रर्रर्र.... वाचा काय आहे भानगड! )
पोलिसांचा धक्कादायक खुलासा
या प्रकरणाचा तपास करणारे अतिरिक्त पोलीस अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ''अनीशचे सितारा या विवाहित महिलेसोबत संबंध होते, असे आम्हाला चौकशीच्या दरम्यान आढळले. सितारा आणि रईस यांनी अनीशच्या हत्येचा कट रचला. त्याला घरी बोलावले आणि नंतर त्याची हत्या केली.''
अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार श्रीवास्तव म्हणाले की, काल रात्री उशिरा अनीशच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाली. "आम्ही हत्येचा गुन्हा दाखल करत असून पुढील कारवाई केली जाईल."
"चौकशीदरम्यान, आम्हाला आढळले की पीडित अनीशचे सितारासोबत संबंध होते. रईस आणि सितारा यांनी अनीशच्या हत्येचा कट रचला, त्याला घरी बोलावले आणि नंतर त्याची हत्या केली," असे ते म्हणाले. सितारा हत्येच्या कटात का सामील झाली, हे स्पष्ट झालेले नाही.