अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्यानेच अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. मात्र त्यानंतर तिच्या बरोबर जे काही झाले ते त्या पेक्षा भयंकर होते. ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. एका नराधमाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यातून ती मुलगी 7 महिन्यांची गर्भवती राहिली. हे त्या नराधमाला समजताच त्याने त्या पेक्षाही भयंकर कृत्य केले. विशेष म्हणजे या कृत्यात त्याला त्याच्या घरच्यानेही साथ दिली. हा नराधम विवाहीत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट परिसरात सागर ढमढेरे नावाचा हा नराधम वास्तव्याला आहे. त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. हे त्याच्या लक्षात येताच 7 व्या महिन्यात त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिचा गर्भपात ही केला. तिचा पाडलेला गर्भ पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वतःच नेऊन पुरला.
मृत अर्भकाला त्याने स्वतः उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरातील स्मशानभूमीत जाऊन दफन केलं. इतक्यावरच तो न थांबता, त्याने यानंतर त्या मुलीला उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिला तिचं नाव आणि वय खोटं सांगण्यास भाग पाडण्यात आलं. मात्र अखेर याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानंतर नराधमासह त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या सगळ्यात सागर ढमढेरे याला त्याची सासू, बहीण आणि मेहुणी यांनीही मदत केल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अन्य कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सागर ढमढेरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. शिवाय याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.