आंध्रप्रदेश: सध्या ओयो या ऑनलाईन रुम बुकिंग सेवेची सर्वत्र चर्चा आहे. प्रत्येक शहरात ओयोच्या रुम्स उपबल्ध असून शहरात येणाऱ्या नव्या प्रवाशांसाठी, कलप्ससाठी या सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मात्र आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून ओयो रुममध्ये गेलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्या जोडप्याने ओयोरुममध्ये असं काही कांड केला की पोलिसही हादरुन गेले, ज्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी एका प्रेमी युगुलाला अटक केली. त्या दोघांनाही ओयोकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेलमधून पकडण्यात आले. दोघेही ओयोवरून खोल्या बुक करायचे आणि असा प्रताप करायचे की पोलिसही हादरुन गेले. अटक करण्यात आलेला तरुण हा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे आणि मुलगी मध्य प्रदेशची आहे.
नेमकं काय करायचे?
नेल्लोर जिल्ह्यातील कवला येथील देवेंद्र राजू आणि मध्य प्रदेशातील संजना मांजा यांच्यात मैत्री झाली नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकत्र राहत होते. खूप पैसे कमवायचे आणि अत्यंत ऐषोरामात आयुष्य जगायचे असं त्यांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी एक भयंकर कट रचला. त्यासाठी त्यांनी ओयो रुम्सचा वापर करण्याचे ठरवले. दोघेही वारंवार ओयो रुम्स बूक करुन राहू लागले, ज्यामुळे संशय आला आणि त्यांच्या कटाचा उलगडा झाला.
आरोपींनी सांगितले की, त्यांना भरपूर पैसे कमवायचे होते त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. दोघांनीही ओयो रूम भाड्याने घेऊन गांजा विकायला सुरुवात केली. कोंडापूरमधील एका ओयो रूममध्ये राहून दोघेही अनेक दिवसांपासून गांजा व्यवसाय करत होते. शुक्रवारी रात्री एसटीएफ पथकाने तपास करून छापे टाकले. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा आणायचे आणि ओयो रूममधून विकत होते, असे सांगण्यात आले.
नक्की वाचा - वर्धा पोलिसांमुळे 15 वर्षांनंतर तुटलेलं नातं पुन्हा जुळलं; अनाथ इशाला सापडलं तिचं कुटुंब!
दरम्यान, आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी ओयो रूममध्ये राहत होता. माहिती मिळताच, पोलिसांना प्रकरण उलगडण्यात यश आले आणि आता एसटीएफ पोलिसांनी मुलगा आणि मुलगी यांना अटक केली आहे आणि त्यांची चौकशी करत आहे.