Crime news: माजी आमदाराच्या मुलाचं घर चोरट्यांनी लुटलं, काय काय चोरलं?

नोकर नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बंगल्याचे गेट उघडे असल्याचे पाहीले.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

माजी शिक्षक आमदारच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरांनी हातसफाई केली आहे. या घटना उघडकीस आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. माजी आमदाराच्या मुलाच्याच घरात चोरील झाल्याचं समजताच पोलीसांचीही धावपळ उडावी. त्यांनी चोरांची शोधाशोध सुरू केली आहे. शिवाय चोरी काय काय झालं आहे याची ही सध्या चर्चा सुरू झाली आहे. पोलीसांनी त्याचीही माहिती आता समोर आणली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिलीप सोनवणे हे माजी आमदार आहे. ते शिक्षक मतदार संघातून निवडून आले होते. चेतनकुमार सोनवणे हा त्यांचा मुलगा आहे. त्याचा धुळे शहरातील देवपूर भागातील वलवाडी परिसरातील धनदाई नगर प्लॉट नंबर 16 याठिकाणी बंगला आहे. ते व्यवसायानिमित्त नाशिकला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या बंगल्यात ते कधी कधी येत असतात. अन्य दिवशी हा बंगला रिकामा असतो. त्या बंदल्यात नोकरां शिवाय कुणी ही नसते. 

ट्रेंडिंग बातमी - Tanaji Sawant : ऋषिराज सावंतला बँकॉकला घेऊन जाणारं ते खासगी चार्टर्ड कोणाच्या मालकीचं? पुण्यातील ऑफिस गायब? 

नोकर नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बंगल्याचे गेट उघडे असल्याचे पाहीले. त्यानंतर बंदल्याचा दरवाजाही उघडा असलेला पाहीला. त्याला लावलेले लॉक ही तोडलेले होते. हे पाहाताच त्या नोकरांनी नाशिक इथे असलेल्या चेतनकुमार सोनवणे यांना याची माहिती दिली. त्यांनी ही तातडीने याबाबतची माहिती  देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिली. शिवाय चोरी झाल्याचं संशय ही निर्माण केला.  

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Case: पोलिसांकडून पाठलाग, 'कराड गँग' स्कॉर्पिओ सोडून पळाली; बीड प्रकरणातील नवा CCTV

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांनी टीम घेवून सोनवणे यांचे घर गाठले. तिथे त्यांना संपुर्ण घराची पहाणी केली. त्यावेळी त्यांना घरातील सामान इकडे तिकडे पडलेला पाहीले. त्याच बरोबर कपाटातील 16 हजार रुपये रोख, चांदीची गणेश मूर्ती, चांदीचे नाणे असा ऐवज चोरांनी लांबवल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय चोरी कुणी केली याचा शोध ही घेतला जात आहे. 

Advertisement