Crime News: आधी गळा आवळला,मग डोकं आपटलं, 80 वर्षाच्या आजी बरोबर नातवानं भयंकर केलं, कारण ऐकून हादराल

गणेश चौगले याला पोलीसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

जाहिरात
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

नातवाला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणाऱ्या आजीचा त्याच नातवाने निर्घुण पणे खून केल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर नातू पसार झाला होता. मात्र पोलीसांनी तातडीने कारवाई करत या नराधम नातवाला अटक केली आहे. त्याच्या दोन साथिदारांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याची चौकशी केल्यानंतर या मागचे कारण पोलीसांच्या समोर आले. ज्यावेळी हे कारण पोलीसांना समजले त्यावेळी हे ही हादरून गेले. या प्रकरणी आता खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गणेश चौगले  हा इचलकरंजीच्या विक्रमनगरमध्ये राहातो. सगुना तुकाराम जाधव ही त्याची आजी आहे. ती 80 वर्षाची आहे.  ती कागलमधल्या भोई गल्लीत राहाते. गणेश आपल्या दोन साथिदारांसह आजीकडे गेला होता. त्याने आजीकडे उसने पैसे मागितले. मात्र तिने ते पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गणेश आणि त्याच्या दोन साथिदारांना राग आला. त्यांनी घरात कुणी नाही हे पाहात आजीचा गळा आवळला. त्यानंतर तिचे डोके जोरात आपटले. त्यात तिचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग बातमी - Bald Virus: बुलडाण्यातील लोकांच्या केसगळतीमागील कारण पंजाबचे गहू, काय आहे होशियारपूर कनेक्शन?

आजीचा खून केल्यानंतर नराधम गणेशने तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या, कानातील सोन्याची कर्णफुले काढून घेतले. त्यानंतर तिथून त्याने पळ काढला. खून झाल्याचे समोर आल्यानंतर महिलेचा दुसऱ्या नातवाने याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर खूनाचा दाखल करण्याय आला. शिवाय पोलीसांनी आपली चक्र फिरवत आरोपी गणेश चौगले याला अटक केली. त्यानंतर खून का केला याची चौकशी केली. आधी त्याने टाळाटाळ केली मात्र पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला.  

ट्रेंडिंग बातमी - Kolhpaur News: लेकीचा आंतरजातीय प्रेमविवाह, बापाचा संताप, जावया सोबत त्यांनी जे केलं ते...

कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथके तयार केली. त्यानंतर या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील चेतन मस्टगे आणि पोलीस उप निरीक्षक शेष मोरे यांची दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. तपास पथके आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने व प्रदिप पाटील यांना गुन्हयातील आरोपी गणेश चौगले हा बालाजी चौक, विक्रमनगर, इचलकरंजी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकांनी बालाजी चौक, विक्रमनगर येथे सापळा लावून आरोपी  गणेश चौगले याला ताब्यात घेतले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: राजन साळवींचं ठरलं! उपनेतेपदाचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेशाची शक्यता, पण मोठा ट्वीस्ट

गणेश चौगले याला पोलीसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गणेशने दिलेल्या माहितीनुसार त्याने काढलेले कर्ज फेडण्यासाठी विक्रमनगर येथील राहते घर विकलेले होते. तरीदेखील त्याचे कर्ज संपलेले नव्हते. म्हणून आजी सगुना जाधव यांच्या खात्यातील बँकेमधील दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये मागण्यास त्याने सुरुवात केली होती. परंतू आजीने पैसे देण्यास नकार दिला. त्या रागातून त्याने मित्रांच्या मदतीने गळा आवळून तिचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान आरोपीकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकूण चार लाख रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीहे पोलीसांच्या ताब्यात आहेत.