पत्नीचे विवाहबाह्य संबध. त्यात एक नाही तर अनेक पुरुषां बरोबर हे संबंध होते. ते ही गावातल्याच पुरूषां बरोबर.याची माहिती बाहेर गावी कामाला असलेल्या पतीला लागली. त्यानंतर या प्रकरणाने एक भयंकर वळण घेतले. आपला भांडा फोड झाला आहे याची कुणकुण पत्नीला लागली. त्यानंतर तिने आपल्या साथिदारांसह असा काही कट रचला की पोलिसही हैराण झाले. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सर्वांना हादरवून सोडणारी ही घटना बिहारच्या बांका जिल्ह्यात घटली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाचं मुंडकं शरीरा वेगळं केलं होतं. रामपूर गावा जवळ असलेल्या एका नाल्या शेजारी हा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसा तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर मृतदेह हा बिहारी यादवचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याने घातलेले कपडे आणि त्याच्या जवळ सापडलेल्या सामानावरून त्याची ओळख पटली.
पण त्याचा खून कुणी केला? मुंडकं शरीरा वेगळं कुणी केलं? हा प्रश्न पोलिसां समोर होता. याबाबत बिहारीची पत्नी रिंकु कुमारीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी काही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. तिने सांगितले की 6 एप्रिलला आपला पती कोलकातावरून निघाला होता. तो त्याच दिवशी पुनसिया पोहचला होता. तो पर्यंत त्याच्या बरोबर बातचीत झाली होती. पण त्यानंतर त्याच्या बरोबर कोणताही संपर्क झाला नाही. असं तिने पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी तिची आणखी चौकशी केली. त्यात तिचे गावातील अन्य पुरूषां बरोबर प्रेमसंबंध होते ही बाब समोर आली. याची माहिती तिचा पती बिहारी यादव याला समजली. त्याने त्यानंतर तिला मारहाण केली. ही मारहाण सतत होत होती. शिवाय तिला तो दर महिन्याचे खर्च करण्याचे पैसे ही देत नव्हता. त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झाला होता. त्यामुळेच तिने आपल्या सहकाऱ्यांसह पतीचाच काटा काढण्याचा कट रचला.
त्यानुसार रिंकु कुमारीने आपले सहकारी बालेश्वर हरिजन आणि बिजुला देवी यांच्या बरोबर मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी तिने बालेश्वर हरिजन याला हत्येसाठी 35 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर 11 एप्रिलला त्याने धारधार चाकूने बिहारी याचा गळा कापून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. या प्रकरणी रिंकु कुमारी, बालेश्वर हरिजन आणि बिजुला देवी यांना अटक केली आहे. त्यांनी आपला गुन्हा ही कबूल केला आहे. हत्या करण्यात आलेला चाकू, रिंकू कुमारीचे रक्ताचे कपडे आणि खून झाला त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.