अमजद खान
सॉफ्टवेअर इंजिनिअर पती कोणत्या थराला जावू शकतो याचा प्रत्यय कल्याणमधील एका प्रकरणावरून समोर आला आहे. सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो कल्याण पश्चिमेला प्रतिष्ठीत अशा सर्वोदय पार्क परिसरात राहातो. पण त्यांने आपल्या पत्नी बरोबर जे कृत्य केलं आहे त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. त्यांना आपल्या पत्नी समोर अशा एकएक मागण्या ठेवल्या की सर्वच जण अवाक झाले आहेत. मागण्यांबरोबर तो नकोत्या गोष्टींसाठीही जबरदस्ती करत होता. पण तेवढ्यावरच त्याचे भागले नाही. त्याने त्यापुढचे पाऊल उचलत सर्व मर्यादाच ओलांडल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कल्याण पश्चिमेला तो राहातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणी बरोबर त्याचा विवाह झाला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. जानेवारी 2024 मध्ये त्याने विवाह केला. त्यानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याणमध्ये राहत होता. लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला. तो पत्नीला त्रास देवू लागला. त्याने पत्नीकडे पंधारा लाखाची मागणी केली. तु तुझ्या माहेरून पंधरा लाख घेवून ये असा तगादा त्याने लावला. पहिल्या बायकोला त्याला घटस्फोट द्यायचा होता. त्यासाठी तिला पंधरा लाख द्यायचे आहेत. ते तिला दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो त्याच्या दुसऱ्या बायकोला सांगत होता. त्यासाठी तो पंधरा लाखाची मागणी करत होता.
यावरच सोहेल थांबला नाही. एक दिवस तर त्याने सर्व मर्यादाच ओलांडल्या. त्याच्या ऑफीसची पार्टी होती. त्या पार्टीत तू चल असा आग्रह त्याने पत्नीला केला. तेवढेच नाही तर या पार्टीत तू माझ्या बॉस बरोबर शरिर संबध ठेव असा दबाव टाकू लागला. यावरून त्याने तिली मारहाण ही केली. आपले ती ऐकत नाही. सर्व गोष्टींना नकार देते. याचा राग त्याला आला. त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता पत्नीला तिथेच तिन तलाक देवून टाकला. या घटनेनं पत्नी हादरून गेली. त्यानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले. त्याने सांगितलेल्या नको त्या गोष्टी करण्यास तिने ठाम नकार दिला होता.
आपल्यावर अन्याय होत आहे. आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे. हे सर्व सहन करण्या पलिकडे गेल्याने, तिने तातडीने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. पत्नीला तीन तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तिन तलाकचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहे. शिवाय सोहेल याच्या या अशाच वर्तवणुकीमुळे त्याची पहिली पत्नीही त्याला सोडून गेल्याचे बोलले जात आहे. पहिल्या पत्नीपासून दुर झाल्यानंतर त्याने घटस्फोटा आधीच दुसरे लग्न केले होते. पण तेही टिकले नाही.