शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून फसवणूक होण्याच्या घटना अलिकडच्या काळात समोर आल्या आहेत. या साईटचा वापर लग्ना पेक्षा फसवणुकीसाठी जास्त केला जात असल्याचं ही वेळोवेळी दिसून आलं आहे. कोल्हापुरातील एका तरुणीची ओळख पुण्यातील एका तरुणा बरोबर याच साईटवर झाली. ती घटस्फोटीत होती. दोघे ही एकमेकाच्या संपर्कात आले. त्याने तिला लग्नाचे आमिष ही दिले. त्याला ती भूलली. ऐवढेच नाही तर त्या दोघांमध्ये शारीरिक संबध ही झाले. मात्र त्यानंतर जे काही झालं त्याने ती तरूणी हादरून गेली आहे. हा संपुर्ण प्रकार कोल्हापूरात झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरातील एका घटस्फोटीत महिलेने शादी डॉट कॉम या वेबसाईट नोंदणी केली होती. या वेबसाईटवरील अकाउंटवरून पुण्यातील एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. तिच्याशी ओळख करून हळूहळू प्रेम संबंध निर्माण केले. या ओळखीनंतर संशयित आरोपीने संबंधित पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ही ठेवले. शिवाय तिला आपण तुझ्या बरोबर लग्न करणार आहोत असं आमिष ही दाखवलं होतं. तिला ही त्याच्यावर विश्वास पटला होता. पण पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही तिला नव्हती. ती तो सांगत होता तसं वागत होती. तो सांगत होता तसं करत होती.
या घटस्फोटीत महिलेने लग्न जमवण्यासाठी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर अकाउंट काढलेलं होतं. या महिलेने तिची स्वतःची सर्व माहिती या वेबसाईटवर टाकलेली होती. या वेबसाईटवरील मोबाईल नंबरच्या आधारे पुण्यातील फिरोज शेख बरोबर तिची ओळख झाली. फिरोज याने तिला मोबाईल नंबरवर फोन करण्यास सुरुवात केली. दोघांच्या या संपर्कानंतर ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेम संबंधांमध्ये झालं. नोव्हेंबर महिन्यात शेख याने पीडित महिलेला लग्नाची इच्छा व्यक्त केली. शेख याने कोल्हापुरात येऊन या पीडित महिलेची भेट घेतली. या भेटीनंतर एका लॉजवर तिच्यासोबत शारीरिक संबंध देखील ठेवले.
फिरोज शेख या व्यक्तीने पीडित महिलेला सुरुवातीला ओळख करून देताना आपण बांधकाम ठेकेदार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान एका व्यावसायिक कामासाठी तिच्याकडून त्याने 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये आयकर विभागाची धाड पडली असल्याची सांगून त्याने आणखी पैशांची तिच्याकडे मागणी केली. यावेळी महिलेने त्याला 11 तोळे दागिने आणि एक लाख रुपये रक्कम दिली. पैसे घेतल्यानंतर फिरोज शेख याने त्या महिलेशी बोलणं बंद केलं. पिडीत त्याला संपर्क करत होती पण तिला तो प्रतिसाद देत नव्हता.
यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं तिला समजलं. तिने तातडीने कोल्हापूरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. झालेली हकीगत तिने पोलिसांनी सांगितली. या महिलेची एक दोन नाही तर तब्बल 11 लाखांची फसवणूक झाली होती. तिने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संबंधीता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास ते करत आहे. लवकरच आरोपीची चौकशी करून त्याला अटक केली जाईल असं सांगितलं जात आहे.