OTP शेअर केला नाही, तरीही 28 लाखांचा गंडा! देशाचा निवृत्त कर्नल अधिकारी हॅकर्सच्या निशाण्यावर, APK फाईल अन्..

मोबाईलवर आलेले OTP अनोळखी किंवा संशयास्पद लोकांसोबत शेअर करू नका, असं आवाहन नेहमीच सायबर सेक्युरिटी तज्ज्ञांकडून दिलं जातं. पण एका चुकीमुळे काय घडतं? वाचा..

जाहिरात
Read Time: 3 mins
Online Money Fraud
मुंबई:

Retired Colonel Online Fraud News : मोबाईलवर आलेले OTP अनोळखी किंवा संशयास्पद लोकांसोबत शेअर करू नका, असं आवाहन नेहमीच सायबर सेक्युरिटी तज्ज्ञांकडून दिलं जातं. पण तुमच्याकडून अशी चूक झाल्यास, तुम्ही साइबर फसवणुकीचे बळी ठरू शकता. एका निवृत्त कर्नल अधिकाऱ्यासोबत मोठी फसवणुकीची घटना घडलीय. ओटीपी शेअर न करताच आर्थिक फसवणूक झाल्याने अनेकांना धक्काच बसला आहे. हॅकर्सनी हुशारीने निवृत्त सैन्य अधिकाऱ्याचे तब्बल 28.87 लाख रुपये लंपास केले. फक्त एक APK फाइल डाउनलोड करून त्यांनी ही साइबर फसवणूक केली. हॅकर्सनी ही फसवणूक कशी केली आणि तुम्ही अशा फसवणुकीपासून कसे वाचू शकता, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

रिटाएर्ड कर्नलची कशी झाली आर्थिक फसवणूक?

द 420च्या रिपोर्टनुसार नोएडाच्या सेक्टर-28 मध्ये राहणारे निवृत्त कर्नल गोपाल कॅनाल यांना 7 नोव्हेंबर रोजी फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) चा अधिकारी म्हणून ओळख करून दिली. त्याने गॅस कनेक्शन रिन्यू करण्याबद्दल सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक APK फाइल पाठवली आणि ती इंस्टॉल करण्यास सांगितले. कर्नलना काही संशय आला नाही आणि त्यांनी ती फाइल उघडली. पुढील दोन दिवस म्हणजे 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कोणताही संशयास्पद मेसेज, कॉल किंवा हालचाल झाली नाही. त्यामुळे सर्व काही ठीक असल्याचे वाटले.

नक्की वाचा >> New Cars In India : आता Creta चा खेळ खल्लास! मारुतीलाही देणार टक्कर, 'या' कंपनीच्या 2 कार मार्केट करणार जाम

10 नोव्हेंबरला कर्नल यांच्या फोनवर अचानक 13 बँक अलर्ट आले. त्यापैकी 7 IMPS ट्रान्सफर होते. IMPS म्हणजे इमीडिएट पेमेंट सर्व्हिस. ही बँकेची एक सेवा आहे ज्याद्वारे तुम्ही त्वरित पैसे पाठवू शकता. पैसे काही सेकंदांत दुसऱ्या खात्यात पोहोचतात. ही सेवा दिवस-रात्र, सुट्टीच्या दिवशीही चालते. IMPS साठी OTP आवश्यक असतो, पण निवृत्त कर्नलना कोणताही OTP आला नाही. फसवणूक करणाऱ्यांनी क्रेडिट कार्डही वापरले आणि लिमिट संपवली. कर्नलना कळेपर्यंत 28.87 लाख रुपये निघून गेले होते. सायबर तज्ज्ञांनी सांगितले की व्हॉट्सअॅपवरून आलेल्या APK फाइलमध्ये स्पायवेअर होते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना फोनवर नियंत्रण मिळाले.

नक्की वाचा >> Video: संतापलेल्या विद्यार्थ्यांनी उशिरा येणाऱ्या शिक्षकाला वर्गातच कोंडून ठेवलं, बाहेरून कुलूप लावलं अन्..

  • फसवणूक करणाऱ्यांना फोनचा पूर्ण अॅडमिन ऍक्सेस मिळाला.
  • बँकेशी संबंधित सिम क्लोन केली.
  • सर्व SMS अलर्ट आणि OTP फसवणूक करणाऱ्यांच्या फोनवर जाऊ लागले.
  • पीडित व्यक्तीच्या फोनवर कोणताही मेसेज आला नाही.
  • फसवणूक करणाऱ्यांना इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि इतर सर्व सेवांचा पूर्ण ताबा मिळाला.
  • व्हॉट्सअॅपवर आलेली कोणतीही APK फाइल इंस्टॉल करू नका, विशेषतः अनोळखी स्रोताकडून आलेली फाइल तर अजिबात इंस्टॉल करू नका.
  • कोणतीही सरकारी संस्था किंवा युटिलिटी सेवा व्हेरिफिकेशनसाठी APK फाइल मागत नाही.
  • जर SMS अलर्ट अचानक बंद झाले किंवा फोनचे नेटवर्क विनाकारण गेले, तर सिम क्लोनिंग झालेली असू शकते.
  • सर्व बँकिंग अॅप्सवर बायोमेट्रिक लॉक लावा आणि पासवर्ड वेळोवेळी बदला.
  • जर सिम विनाकारण डीअॅक्टिव्हेट वाटत असेल, तर त्वरित टेलिकॉम कंपनीशी संपर्क साधा.