D-Mart News : देशातील मोठी रिटेल चेन असलेल्या डी-मार्ट (D-Mart) मध्ये एका धक्कादायक फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. राजस्थानमधील अलवर शहरात असलेल्या डी-मार्टच्या स्टोअरमध्ये एका कर्मचाऱ्यानेच नकली बारकोडचा वापर करून कंपनीला लाखो रुपयेचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. अरावली विहार पोलिसांनी स्टोअरमधूनच या गोरखधंद्याचा पर्दाफाश करत, नरेंद्र पुत्र कुशाल या आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा कर्मचारी महागड्या वस्तूंवर बनावट बारकोड लावून त्यांची किंमत जाणीवपूर्वक कमी करायचा, ज्यामुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी नरेंद्र हा उपला सोनावा येथील रहिवासी आहे. त्याने कंपनीच्या सिस्टीममध्ये नसलेली एक वेगळीच शक्कल लढवली. सुरुवातीच्या तपासात उघड झाले आहे की, तो स्टोअरमध्ये विकल्या जाणाऱ्या महागड्या उत्पादनांवर स्वतः तयार केलेले जाली (बनावट) बारकोड लावत होता.
या नकली बारकोडमुळे, उत्पादनांची मूळ किंमत बिलिंगच्या वेळी खूपच कमी दाखवली जात होती. या चलाखीचा वापर करून आरोपी स्वतःसाठी किंवा आपल्या साथीदारांसाठी अत्यंत कमी किंमतीत किमती सामान स्टोअरमधून बाहेर काढत होता. यामुळे कंपनीला थेट लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.
( नक्की वाचा : Ulhasnagar News: '25 लाखांचा फ्लॅट 10 लाखांत! बागेश्वरबांबांचं नाव आणि आजीसोबत 'मोठा गेम', उल्हासनगर हादरलं )
कसं झालं उघड?
डी-मार्टसारख्या मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये प्रत्येक उत्पादनाचा हिशोब स्टॉक इन्व्हेंट्री (Stock Inventory) आणि बिलिंग सिस्टीमद्वारे ठेवला जातो. मात्र, डी-मार्ट व्यवस्थापनाने नियमित स्टॉक मिलान (Stock Matching) आणि विक्रीच्या आकडेवारीची तपासणी केली, तेव्हा हा मोठा घोटाळा उघडकीस आला.
अरावली विहार पोलीस ठाण्याचे सहायक उप-निरीक्षक (ASI) शंकर लाल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. डी-मार्ट व्यवस्थापनाने पोलिसांकडे एक लेखी तक्रार केली होती, ज्यात बिलिंग आणि स्टॉक मिलानमध्ये गंभीर अनियमितता (Serious Irregularities) आढळल्याचे म्हटले होते. बिलिंगदरम्यान उत्पादनांची वास्तविक किंमत खूपच कमी नोंदवली जात असल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला होता.
( नक्की वाचा : Trending News : एका महिलेनं केली 4 लग्न, 2 पोलीस अधिकारी, दोन बँक मॅनेजरला ओढलं जाळ्यात, कसा झाला पर्दाफाश? )
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर ही गडबड कोणतीही तांत्रिक बिघाड नसून, ती जाणीवपूर्वक केलेली फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी नरेंद्र हा उत्पादनांवर लावलेला असली बारकोड काढून टाकत होता किंवा त्याच्यावर नकली बारकोड चिकटवत होता.
हा नकली बारकोड त्याने कमी किंमतीसाठी प्रोग्राम केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. जेव्हा बिलिंग काउंटरवर हे सामान स्कॅन केले जात होते, तेव्हा बनावट बारकोडमुळे किंमत खूपच कमी येत होती, ज्यामुळे कंपनीला प्रत्येक उत्पादनामागे मोठे नुकसान सोसावे लागत होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अरावली विहार पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपी नरेंद्रला अटक केली आहे. आरोपीवर फसवणूक (IPC ची धारा 420) आणि जालसाजीसह भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय शंकर लाल यांनी सांगितले की, "आम्ही सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहोत. ही फसवणूक नेमकी किती कालावधीपासून सुरू होती आणि महत्त्वाचे म्हणजे, या घोटाळ्यात कोणताही बाहेरील व्यक्ती किंवा स्टोअरमधील दुसरा कर्मचारी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे."