Wife kills Husband with Lover : इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर (Raja Raghuvanshi Murder Case) संपूर्ण देश हादरला आहे. या हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. आरोपी पत्नी सोनम आणि तिच्यासोबत या हत्याकांडातील इतर आरोपींना अटक केली आहे. पोलीस त्या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच दिल्लीमधून असेच एक प्रकरण उघड झाले आहे. दिल्लीतील एका पॉश भागातून हे प्रकरण सुरु झाले. त्याचा शेवट हा उत्तराखंडातील डोंगराळ भागात झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. पत्नीने हे सर्व पतीच्या मालमत्तेसाठी आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी केल्याचे सांगितले जात आहे. ही घटना दिल्लीतील राजोकरी भागातील आहे.
प्रकरण कसे उघडकीस आले?
खरं तर, या हत्येबद्दल कुणालाही कळले नसते, पण 5 जून रोजी उत्तराखंडच्या दुगड्डा परिसरातील एका दरीत मिळालेल्या मृतदेहाने हे हत्याकांड सर्वांसमोर आणले. रविंद्र कुमार असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. त्याची हत्या करण्यापूर्वी त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यावेळी त्यांना ना घटनास्थळावरून एक चिठ्ठी मिळाली, ज्यात रवींद्र आपल्या पत्नीसोबत ज्या गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता त्याचे नाव होते.
( नक्की वाचा : Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ )
त्यांनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा आणि स्थानिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रविंद्रची पत्नी सिंधूला शोधून काढले. सिंधूला पोलिसांनी तिच्या पतीबद्दल विचारले, तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. शेवटी, कठोर चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबूल केला.
पत्नी करत होती नाटक
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, रविंद्रच्या हत्येमध्ये सहभागी असलेली त्याची पत्नी सिंधू अनेक दिवस रविंद्र बेपत्ता झाल्याचे नाटक करत होती. पोलिसांनुसार, आरोपी महिला दिल्लीत फिजिओथेरपी क्लिनिक चालवते. याच दरम्यान तिची परितोष नावाच्या व्यक्तीशी भेट झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. सिंधूने परितोषसोबत मिळून आपला पती रवींद्रला संपवण्याची योजना आखली आणि त्यानुसार त्यांनी ही हत्या केली.