Shocking: 'स्वीटी बेबी डॉल' बोलून चैतन्यानंद बाबा करत होता मुलींचा सौदा; व्हॉट्सॲप चॅटने उघड झाला 'डर्टी' खेळ

Baba Chaitanyananda :  दिल्लीतील डर्टी बाबा चैतन्यानंद याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांना त्याच्या जुन्या व्हॉट्सॲप चॅट्समधून मुलींशी गैरवर्तन आणि 'मुलींचा सौदा' करण्याचा डर्टी खेळ उघड झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Baba Chaitanyananda : बाबा चैतन्यानंदच्या चॅटमधून अनेक खुलासे झाले आहेत.
मुंबई:

Baba Chaitanyananda :  दिल्लीतील डर्टी बाबा चैतन्यानंद याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांना त्याच्या जुन्या व्हॉट्सॲप चॅट्समधून मुलींशी गैरवर्तन आणि 'मुलींचा सौदा' करण्याचा डर्टी खेळ उघड झाला आहे. 'स्वीटी बेबी डॉल' आणि 'माई बेबी डॉल' अशा शब्दांचा वापर करून हा बाबा मुलींना जाळ्यात ओढत होता. एका चॅटमध्ये तर त्याने दुबईतील एका शेखसाठी 'सेक्स पार्टनर' शोधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे."

काय आहे संभाषण?

या चॅटमध्ये  चैतन्यानंद मुलींना 'माई बेबी डॉल' (My Baby Doll) म्हणून संबोधित करताना दिसत आहे. अशाच एका मेसेजमध्ये बाबा दुबईच्या एका शेखसाठी (Sheikh) मुलींना तयार करण्याचा प्रयत्न चैतन्यानंद करत आहे.

बाबा चैतनान्यानंद आणि पीडित मुलीचं संभाषण

बाबा:  दुबईचा एक शेख सेक्स पार्टनर (Sex Partner) शोधत आहे, तुझी कोणी चांगली मैत्रीण आहे का?
पीडित:  कुणी नाही
बाबा:  हे कसे शक्य आहे?
पीडित:  मला माहित नाही
बाबा:  कुणी तुझी क्लासमेट (Classmate) असेल? किंवा कोणी ज्युनियर (Junior)?

( नक्की वाचा : Love Story: 12वीच्या विद्यार्थिनीने केले शिक्षकाशी लग्न; Video शेअर करत पोलिसांकडे केली मोठी मागणी )
 

अशाच एका दुसऱ्या चॅटमध्ये चैतन्यानंद मुलींशी गैरप्रकारे बोलताना दिसत आहे. तो मुलींसाठी 'स्वीटी बेबी बेटी डॉल' (Sweety Baby Beti Doll) सारख्या शब्दांचा वापर करतोय.

Advertisement

'बेबी' (7:49 PM)
'बेबी तू कुठे आहेस' (12:40 PM)
तू माझ्यावर इतकी का रागावली आहेस? (12:41 PM)

अशाच एका अन्य मेसेजमध्ये बाबा लिहितो की, गुड इव्हिनिंग (Good Evening) माझ्या सर्वात प्रिय बेबी डॉल बेटी...

पीडिता: आफ्टरनून (Afternoon) सर... हॅप्पी आफ्टरनून (Happy Afternoon).. तुम्हाला काही पाहिजे आहे का सर?

याशिवाय बाबा मुलींशी मस्करीमध्ये म्हणतो की, मी डिस्को डान्स (Disco Dance) करत आहे, तू माझ्यासोबत करशील का?

कधी झाली अटक?

काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बाबा चैतन्यानंदला आग्राच्या ताजगंज (Tajganj) परिसरात रविवारी पहाटे 3:30 वाजता एका हॉटेलमधून अटक केली. पोलिसांनुसार, तो गेल्या दोन महिन्यांपासून मथुरा, वृंदावन आणि आग्रा दरम्यान भटकत होता आणि लहान हॉटेलमध्ये लपून बसला होता.
 

Topics mentioned in this article