धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना का सोडलं? मुलानं केला खळबळजनक खुलासा

कौटुंबीक न्यायालयाच्या आदेशानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या संबंधावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या संपूर्ण विषयावर धनंजय आणि करुणा यांचा मुलगा सीशिव मुंडे यानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री  धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार केल्याचा हवाला देत  करुणा मुंडे यांना दैनंदिन खर्चासाठी महिन्याला 2 लाख रुपये द्या असा आदेश कोर्टाने दिला आहे. या आदेशानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या संबंधावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या संपूर्ण विषयावर धनंजय आणि करुणा यांचा मुलगा सीशिव मुंडे यानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माझे वडील माझ्यासाठी त्रासदायक नव्हते, असा खुलासा सीशिव इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये दिला आहे. श्रीशिव मुंडे यांनी या पोस्टमध्ये त्याचे वडील धनंजय मुंडे 2020 पासून आपली काळजी घेत असल्याचा दावा केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे पोस्ट?

मी सीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे.

माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही त्रासदायक नव्हता.  माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे त्रस्त असे.  त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढत असे.

जो घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरगुती हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून होत असे.

Advertisement

माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा काहीही संबंध राहिला नव्हता.  

2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची संपूर्ण काळजी घेत आहेत.

( नक्की वाचा : धनंजय मुंडेंना मोठा धक्का! करुणा मुंडेंना महिन्याला पैसे द्यावे लागणार; कोर्टाचे मोठे आदेश )
 

 माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते,' असा दावा सीशिव धनंजय मुंडेनं केला आहे.