नागिंद मोरे, धुळे:
Dhule Crime: धुळे शहरातील गुरुद्वारा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी लाठी काठी तलवारींसह गोळीबार करण्यात आला. बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर गादीवरून निर्माण झालेल्या वादातून हा सर्व प्रकार घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या...
शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटात राडा...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली असून, या घटनेत दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.. तसेच यावेळी गोळीबार देखील झाल्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
धुळ्यातील गुरुद्वारात उद्या गुरुगोविंद सिंग यांची जयंती साजरी होणार होती, दोन गटात वाद झाल्याची घटना घडली असून गुरुद्वाराचे उत्तर अधिकारी नेमण्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. बाबा धीरज सिंग यांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उत्तराधिकारी नेमण्याची मागणी स्थानिक शीख धर्मीय बांधवांकडून करण्यात आली होती.
गादीवरुन झाला होता वाद...
पंजाब येथून आलेल्या शीख दरमियांच्या समितीने बाबा रणवीर सिंग यांची नियुक्ती केली होती, बाबा रणवीर सिंग यांच्या नियुक्तीला स्थानिक शिखधर्मीय बांधवांकडून विरोध करण्यात आला होता. या वादातूनच ही घटना घडण्याची सांगण्यात येत असून या ठिकाणी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.