Crime news: पाळीव कुत्र्याबरोबर खेळणं तरूणाला महागात पडलं, खेळताखेळता भयंकर घडलं

शुक्रवारीही तो आपल्या कुत्र्याबरोबर घरच्या टेरेसवर बराच वेळ खेळत होता. त्यावेळी त्याच्या बरोबर घरातील अन्य कोणी नव्हते.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

धुळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. टेरेसवर कुत्र्याबरोबर खेळणं एका तरूणाला महागात पडलं. कुत्र्याबरोबर  खेळताखेळता या तरूणाचा तोल गेला. तो थेट खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो खाली पडल्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उशीर झाला होता. योगायोगम्हणजे या तरूणाचे वडील हे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. पण तेही आपल्या लेकाला वाचवू शकले नाहीत.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे शहरात अर्चना हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल डॉ. संजय अग्रवाल यांचे आहे. निष्णात डॉक्टर म्हणून संजय यांची ओळख आहे. त्यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अर्पण अग्रवाल आहे. त्याचे वय अवघं सतरा वर्ष आहे. अग्रवाल यांच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे. याच्या बरोबर सकाळी खेळणं हा अर्पणचा दिनक्रम आहे. तो आपल्या कुत्र्या बरोबर दररोज आपल्या टेरेसवर खेळायचा. 

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याच एन्काऊंटर केला तर 51 लाखाचं बक्षिस अन्...

शुक्रवारीही तो आपल्या कुत्र्याबरोबर घरच्या टेरेसवर बराच वेळ खेळत होता. त्यावेळी त्याच्या बरोबर घरातील अन्य कोणी नव्हते. पाळीव कुत्रा आणि अर्पण खेळत असताना अर्पणच्या लक्षात आले नाही. त्याच धुंदीत त्याचा तोल गेला. तो टेरेसवरून खाली कोसळला. तो थेट डोक्यावर आपटला. त्यामुळे त्याच्या डोक्यावर जबर जखम झाली. तो पडल्यानंतर एकच खळबळ उडाली.  धावाधाव झाली. त्याला त्यानंतर तातडीने रूग्णालयात हलवण्यात आलं.

ट्रेंडिंग बातमी - बीड सरपंच हत्या प्रकरण! CM फडणवीसांचा मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार

अर्पणच्या डोक्याला लागलेला मार हा जबर होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला ज्या वेळी रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याला मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी त्याचा मृतदेह धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत आता पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र अचानक झालेल्या या घटनेनं अर्पणच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शिवाय सर्वत्र हळहळ ही व्यक्त केली जात आहे.  

Advertisement