Dhule News: अनधिकृत कॅफेत पडद्याआड तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, पोलीस पोहोचले अन्...

आमदार, मनपा आयुक्त तसेच पोलीस अधिकक्षकांनी संयुक्त मोहीत काढत या अनधिकृत कॅफेंवर छापा टाकला.

जाहिरात
Read Time: 3 mins
धुळे:

कॉलेजला जाणारे तरुण तरुणी कॅफेत जाण्याच्या नावाखाली नको ती कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ते ज्या कॅफेत जात होते ते ही अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. शहराच्या मध्यभागीच अवैध कॅफेचा हा बाजार मांडला गेला होता. त्यामुळे आजूबाजूला राहाणाऱ्यांच्या नाकीनऊ आले होते. हे सर्व घडत होतं धुळे शहरातील देवपूर हा परिसरात. याबाबतची तक्रार स्थानिक आमदारांना समजली. त्यानंतर या कॅफेंवर पोलीसांसहीत धाड टाकण्यात आली. त्यावेळी त्यांनी जी काही दृष्य पाहीली ती धक्कादायक तर होतीच पण तरुणाई कोणत्या मार्गाने चालली आहे याचा विचार करायला लावणारी होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये अवैध कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई केली. आमदारांसह आयुक्त व पोलीस अधिक्षकही या कारवाईत सहभागी झाले होते. धुळे शहरातील देवपूर भागात  दत्तमंदिर येथे नामांकित कॉलेज आहे. याच कॉलेजच्या परिसरातील अनेक कॅफे थाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कॅफे अनधिकृत आहेत. या कॅफेमध्ये कॉलेजचे तरुण आणि तरुणी जात असतात. या कॅफेत या तरुण तरुणींना निवांत पणा मिळावा म्हणून कॅबिन करण्यात आले आहे. शिवाय त्याला पडदेही लावण्यात आले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  MNS Melava: निकालानंतर सन्नाटा, निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. अखेर राज ठाकरे गरजले!

या पडद्याआड हे तरुण तरुणी राजरोस पणे अश्लिल चाळे करत असतात. शहराच्या अगदी मध्यभागी असे प्रकार सुरू होते. त्या परिसरात राहाणाऱ्या लोकांना याचा त्रास होत होता. शिवाय हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात की अशा नको त्या गोष्टी करण्यासाठी कॉलेजात येतात असा प्रश्न तिथले स्थानिक उपस्थित करत होते. शिवाय अशा कॅफेंना परवानगी कुणी दिली अशी ही विचारणा केली जात होती. त्यातून स्थानिक आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे याची तक्रार करण्यात आली. त्यांनीही याबाबत कारवाई करण्याचे ठरवले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - MNS Melava: ED ला घाबरुन मोदींना पाठिंबा? राज ठाकरेंनी छत्रपतींची शपथ घेऊन 'ती' गोष्ट सांगितली; म्हणाले...

त्यानुसार आमदार, मनपा आयुक्त तसेच पोलीस अधिकक्षकांनी संयुक्त मोहीत काढत या अनधिकृत कॅफेंवर छापा टाकला. छापा टाकल्यानंतर जे काही पोलीसांनी पाहीले ते पाहून त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. शिवाय अचानक पडलेल्या या धाडीमुळे एकच खळबळ ही उडाली. देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेजची मुले-मुली अश्लील चाळे करत होत. देवपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना ही मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला.  शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकण्यात आला. यात अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले . 

Advertisement