पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे लाचखोर संचालक तेजस गर्गे अखेर निलंबित

नाशिक लाचलूचपत विभागाने केलेल्या कारवाईत गर्गे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे लाचखोर संचालक तेजस गर्गे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. नवीन उद्योगासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पुरातत्व खात्याच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी दीड लाखाची लाच स्वीकारली होती. विशेष म्हणजे यामध्ये तेजस गर्गे यांचा हिस्सा असल्याचेही एसीबीच्या चौकशीत समोर आले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याप्रकरणी डॉक्टर तेजस गर्गे आणि आरती आळे विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अटक टाळण्यासाठी गर्गे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने काही अटींवर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यामुळे लाचखोर गर्गेला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे शासनाकडून तेजस गर्गे यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा -  काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून नवा वाद? धानोरकर-पटोलेंमध्ये ठिणगी

नाशिक लाचलूचपत विभागाने केलेल्या कारवाईत गर्गे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. नाशिक इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाला पुरातत्व खात्याच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी दिड लाख रूपये घेवून ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यात 75 हजारांचा वाटा हा गर्गे यांचा होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर गर्गे हे फरार झाले होते. त्यांनी कोर्टाकडून अटक पूर्व जामीनही मिळवला आहे. पण सरकारने त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलत त्यांना निलंबित केले आहे.   

Advertisement