Modern Parents: मुलांसाठी आई-वडील देव असतात; परिस्थिती कितीही बिकट असली तरी ते मुलांचा त्याग करत नाहीत, पण या उद्योगपती कुटुंबाने हे खोटे ठरवले आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:च्या दिव्यांग मुलीला उज्जैनच्या आश्रमात 15 दिवसांसाठी सोडलं होतं. पण, आता तब्बल 5 वर्ष उलटली, पण त्यांनी मुलीची साधी चौकशी देखील केलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
इंदूर जिल्ह्यातील एका उद्योगपती कुटुंबाने पाच वर्षांपूर्वी त्यांच्या 3 वर्षांच्या दिव्यांग मुलीला उज्जैन आश्रमात मरण्यासाठी सोडून दिले. गेल्या पाच वर्षांपासून आश्रमात जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये हेलकावे खात असलेल्या या दिव्यांग मुलीला 2020 मध्ये उद्योगपती कुटुंबाने 15 दिवसांसाठी आश्रमात ठेवण्यासाठी सोडले होते, परंतु ते आजपर्यंत परत आले नाहीत.
जन्मजात दिव्यांग असलेली सजल गेल्या पाच वर्षांपासून उज्जैनच्या आश्रमात क्षणोक्षणी मृत्यूची वाट पाहत आहे. इंदूर येथील अग्रवाल नगरमध्ये राहणाऱ्या ऑटोमोबाईल व्यापारी पिंकेश अग्रवाल आणि प्रीती अग्रवाल यांच्या घरी 22 एप्रिल 2017 रोजी सजलचा जन्म झाला. ती पूर्णपणे दिव्यांग होती. उद्योगपती आई-वडिलांनी 3 वर्षांच्या वयातच दिव्यांग मुलीला सोडण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य )
15 दिवसांसाठी सोडलं होतं...
या प्रकरणातील अहवालानुसार सुमारे 5 वर्षांपूर्वी उद्योगपती कुटुंब दिव्यांग मुलगी सजलला 15 दिवस ठेवण्याची विनंती करून आश्रम संचालक सुधीर भाई गोयल यांच्याकडे सोडून गेले होते. त्यानंतर ते आजपर्यंत परत आलेले नाहीत. त्यांनी मुलीची कोणतीही चौकशी केलेली नाही. . आश्रमाकडून अनेकवेळा संपर्क साधण्यात आला, परंतु सध्या 8 वर्षांची झालेल्या सजलला भेटायलाही ते तयार नाहीत.
सजलचे प्रकरण समोर आल्यानंतर एनडीटीव्हीची टीम उज्जैनपासून 22 किलोमीटर दूर असलेल्या सेवाधाम आश्रमात पोहोचली. आश्रम संचालक गोयल यांनी सांगितले की, मित्तल कुटुंब खाटू श्यामचे भक्त आहे आणि धार्मिक कार्यांवर लाखो रुपये खर्च करते, परंतु मरणासन्न असलेल्या दिव्यांग सजलला गेल्या पाच वर्षांत एकदाही भेटायला आश्रमात आले नाही.
( नक्की वाचा : आई की हैवान? अडीच वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदातीच्या संमतीनंच झाला भयंकर अत्याचार, मुंबईतील भयंकर घटना! )
गोयल यांनी सांगितले की, सजलचे आजोबा पुरुषोत्तम मित्तल मोठे उद्योगपती आहेत. सजलला एक मोठी बहीण देखील आहे. ती निरोगी असल्याने कुटुंबाने तिला स्वत:जवळच ठेवले, परंतु दिव्यांग सजलचा त्याग केला. सजलच्या कुटुंबात आजोबा-आजी, आई-वडील, काका-काकू आहेत, परंतु कुणालाही दिव्यांग मुलीवर प्रेम नाही. तिला स्वीकारण्याची त्यांची इच्छाही नाही.
उज्जैन सेवाधाम आश्रमाचे संचालक सुधीर भाई गोयल यांनी सांगितले की, 'तीन वर्षांच्या वयात दिव्यांग सजलला तिचे आजोबा हे सांगून आश्रमात सोडून गेले होते की, सजलच्या वडिलांचा (पिंकेश) अपघात झाला आहे. घरात कोणीही तिची काळजी घेणारे नाही, म्हणून सजलला फक्त 15 दिवस ठेवा.'
मारण्याचा केला होता प्रयत्न
उज्जैन सेवाधाम आश्रमात 8 वर्षांची सजल मरणासन्न अवस्थेत आहे, परंतु तिचे कोणीही तिच्याजवळ नाही. काही दिवसांपूर्वी सजलच्या मरणासन्न अवस्थेची माहिती देऊनही कुटुंबातून कोणीही पोहोचले नाही. याबाबत मिळालेल्या एका माहितीनुसार सजल दोन वर्षांची असताना तिला मारण्याचा प्रयत्न म्हणून तिच्या आईने तिला एका मजल्यावरून खाली फेकले होते. परंतु ती वाचली म्हणून तिला आश्रमात पाठवून देण्यात आले