Dombivli News : डोंबिवली हादरली! पलवा सिटीजवळ सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितलं?

Dombivli News : डोंबिवलीतील सिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli News : डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
डोंबिवली:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Dombivli News : डोंबिवलीतील डायघर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीच्या प्रसिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये आज (सोमवार) एका 25 वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, प्राथमिक तपासात ही अत्याचारासह हत्येची घटना असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार, डायघर येथील खाडी किनारी एका बेवारस सुटकेसकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष गेले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुटकेस उघडली असता, आतमध्ये एका 25 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात आरोपींनी आधी या महिलेवर अत्याचार केला असावा. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने तो सुटकेसमध्ये बळजबरीने कोंबून खाडीच्या पाण्यात फेकून दिला असावा. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

( नक्की वाचा : Lady Doctor Suicide : अमेरिकेच्या एका 'नाही' मुळे टॅलेंटेड डॉक्टरचा शेवट! आईने सांगितले धक्कादायक सत्य )

सध्या पोलीस सर्वात आधी या मृत तरुणीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. त्यासाठी आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या मिसिंग तक्रारींची (Missing Complaints) तपासणी केली जात आहे. महिलेचा मृत्यू गळा आवळून झाला आहे की अन्य कोणत्या कारणामुळे, हे निश्चित करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Advertisement

याशिवाय, ही सुटकेस याच परिसरात टाकण्यात आली होती की खाडीच्या प्रवाहातून ती वाहून आली, याचाही तपास पोलीस पथके करत आहेत. खाडीतील पाण्याचा प्रवाह आणि परिसर यानुसार तपासणीचे चक्र फिरवले जात आहे.

Topics mentioned in this article