Dombivli News डोंबिवलीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धांना मारायचे अन् लुटायचे, 2 भावांनी तयार केलेली गँग अटकेत

मॉर्निंग वॉकला जाताना एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करून त्याला लुटल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. विष्णुनगर पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli Robbery Crime

Dombivli Crime News Today :  मॉर्निंग वॉकला जाताना एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करून त्याला लुटल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. विष्णुनगर पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींपैकी सहा अल्पवयीन आहेत.धक्कादायक म्हणजे अल्पवयीन तरुण या गँगचे मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे.या अल्पवयीन तरुणाने एकाची हत्या देखील केली आहे.बाल सुधार गृहातून सुटक्या झाल्यानंतर अल्पवयीन तरुणाने त्याच्या अल्पवयीन भावासोबत चोरट्यांची गँग तयार केली. 

काही दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिम येथील देवीच्या पाडा परिसरात राहणारे 64 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती मॉर्निंग वॉकला जाताना काही तरुणांनी त्यांना काठीने मारहाण केली.मारहाणीत वयोवृद्ध व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडले.याचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.परिसरातील सीसीटीवीच्या सहाय्याने विष्णूनगर पोलिसांनी आरोपींच्या शोध सुरू केला आणि नऊ जणांचा छडा लावला.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे.त्यापैकी सहा अल्पवयीन आहेत.या सहा अल्पवयीन तरुणांना भिवंडी बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' भागात गँगवार, सराईत गुन्हेगार विशाल काळेची गोळ्या झाडून हत्या

चोरलेले दागिने दिवा येथील एका ज्वेलर्सला विकले

तर इतर तीन आरोपींना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.यामध्ये चिंतन नंदा,मोहित जाधव आणि स्वप्निल भोईर यांचा समावेश आहे. मोहित आणि चिंतन हे दोघे गुन्ह्यात सहभागी होते.तर स्वप्निल यांनी चोरलेले दागिने दिवा येथील एका ज्वेलर्सला विकले होते.तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.अल्पवयीन सहा तरुणांपैकी एका तरुणाने आपल्या भावासोबत एक गँग तयार केली.

नक्की वाचा >> IAS Manisha Mhaiskar: "मुलगी जेव्हा जन्मते,तेव्हा ती जन्मत: शक्ती असते",IAS मनीषा म्हैसकर यांचं मोठं विधान

या अल्पवयीन तरुणावर एकूण चार गुन्हे दाखल आहेत.यामध्ये हत्येचा गुन्हा देखील आहे.त्याच्या भाऊ देखील सराईत चोरटा आहे.दोन्ही भावांनी मिळून चोरट्यांची गँग तयार केली आणि या गँगने चोरी आणि लुटीचे धंदे सुरू केलं. त्यांनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत.त्याचा तपास एसीपी सुहास हेमाडे आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.