Lady Doctor Suicide : अमेरिकेच्या एका 'नाही' मुळे टॅलेंटेड डॉक्टरचा शेवट! आईने सांगितले धक्कादायक सत्य

Lady Doctor Suicide : शहराच्या दुसऱ्या भागात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ही घटना उघडकीस आली

जाहिरात
Read Time: 3 mins
Lady Doctor Suicide : डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Lady Doctor Suicide :  परदेशात करियर करण्यासाठी जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते जगत असतात. पण, काही कारणांमुळे या स्वप्नाला धक्का लागतो त्यामुळे काही काळ येणारी निराशा स्वाभाविक आहे. पण, याच निराशेतून एका डॉक्टर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.  आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील एका 38 वर्षीय महिला डॉक्टरने अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून हैदराबादमधील तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

डॉ. रोहिणी (Rohini) असे या डॉक्टरचे नाव आहे. त्या हैदराबादमधील पद्मा राव नगर येथे राहत होत्या. शहराच्या दुसऱ्या भागात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. कारण रोहिणी यांनी दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीने (domestic help) कुटुंबीयांना फोन करून कळवले होते.

स्वप्न भंगल्याने वाढले नैराश्य

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहिणी यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक केला असावा किंवा स्वतःला इंजेक्शन टोचले असावे, असा संशय आहे. नेमक्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर (post-mortem report) स्पष्ट होईल.

( नक्की वाचा : Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )
 

या फ्लॅटमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यात त्यांनी नैराश्यात असल्याचे आणि व्हिसा अर्ज नामंजूर झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. रोहिणी यांच्या आई लक्ष्मी यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांच्या मुलीला अमेरिकेत नोकरीसाठी जायची खूप इच्छा होती, पण व्हिसा नाकारल्यामुळे त्या खूप निराश झाल्या होत्या.

Advertisement

भविष्याची होती मोठी स्वप्न...

लक्ष्मी यांनी पुढे सांगितले की, रोहिणी यांनी 2005 ते 2010 या काळात किर्गिस्तानमध्ये (Kyrgyzstan) एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड अतिउत्कृष्ट होते आणि त्यांनी भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली होती. रोहिणी यांना इंटरनल मेडिसिनमध्ये (Internal Medicine) स्पेशलायझेशन करायचे होते, म्हणून त्या पद्मा राव नगर येथे राहत होत्या, कारण तिथे जवळच लायब्ररी होती.

लक्ष्मी यांनी रोहिणीला भारतात राहून प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला होता, पण रोहिणी यांनी सांगितले होते की, अमेरिकेत दररोजचे रुग्ण कमी असतात आणि उत्पन्न (income) देखील उत्तम मिळते.

Advertisement

त्यांच्या आईने सांगितले की, व्हिसा मंजुरीची वाट पाहत असताना रोहिणीच्या निराशेत आणि नैराश्यात खूप वाढ झाली होती, ज्यामुळे त्या मानसिकरित्या थकून गेल्या होत्या आणि एकाकी पडल्या होत्या. रोहिणी यांनी लग्न केले नव्हते आणि त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्यांच्या वैद्यकीय करिअरला समर्पित केले होते.

चिलकलगुडा पोलिसांनी (Chilkalguda Police) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article