दिल्ली पोलिसांनी अंमली पदार्थांच्या व्यवसायाला हादरा देणारी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 500 किलो कोकेन जप्त केलं आहे. त्याची किंमत 7 हजार कोटींच्या आसपास आहे. हे ड्रग्ज दुबईहून आलं होतं. ते दिल्लीपर्यंत कसं पोहोचलं? ते कुठं नेलं जाणार होतं? या ड्रग्जचे ग्राहक कोण होते पाहूया
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीत कसं आलं ड्रग्ज ?
दिल्ली पोलिसांना शहरात सक्रीय असलेल्या एका संदिग्ध ड्रग्ज कार्टलचा गुप्त मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर इंटरनॅशनल ड्रग रॅकेटचा सुगावा लागला होता. विदेशातून कोकेनचा मोठा साठा दिल्लीत येणार होता. हा साथा पनामा पोर्टमधून दुबईमार्गे गोव्यात आला होता. गुप्त चर्चेनुसार हा साठा उत्तर प्रदेशातील हापूड आणि गाझियाबाद त्यानंतर दिल्लीतील महिपालपूरमध्ये येणार होता. ही माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी जाळं टाकलं आणि साठा जप्त केला.
( नक्की वाचा : गुन्हेगारांनी तयार केलं सर्वोच्च न्यायालय, CJI देखील बनले! बड्या उद्योगपतीची 7 कोटींची फसवणूक )
कुणाला होणार होती विक्री?
- दिल्ली पोलिसांनी 562 किलो ग्रेड-1 कोलंबियन कोकेन जप्त केलं आहे.
- ड्रग्जचा हा साठा दिल्लीमधील महिपालपूरमधील गोदामा ठेवण्यात आले आहे.
- तुषार गोयल नावाचा व्यक्ती या अंमलीपदार्थाच्या साठ्याचा मुख्य वितरक आहे.
- मेक्सिको, इथियोपीया आणि दुबईतून हे ड्रग्ज दिल्लीत आणण्यात आले
- या ड्रग्जचा कॉलेजचे विद्यार्थी, व्यावसायिक तसंच दिल्ली आणि मुंबईतील श्रीमंत उद्योजकांना विक्री होणार होती
- शर्टाच्या बॉक्समध्ये लपवून अंमली पदार्थ टार्गेटपर्यंत पोहचवण्यात येणार होते.
- या ड्रग्जची 8 ते 16 हजार रुपये प्रती ग्रॅम दरानं विक्री होणार होती.
पोलिसांना या कोकेनची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं जाळं विणलं. ड्रग्जला मोठ्या गोण्यांमध्ये पॅक करुन ट्रकमधून दिल्लीत आणण्यात येणार होते. 500 किलो कोकेनचे 50 लाख डोस बनवण्याची योजना होती. नशेचे हे डोस दिल्ली मुंबईसह अन्य भागांमध्ये पोहचवण्याची योजना होती. पण, तस्करांचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही. त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील किनपिंगलाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस यामधील इंटरनॅशनल ड्रग्ज सिंडिकेट कनेक्शनचा तपास करत आहेत.