Naxalites Encounter: बालाघाटमध्ये मोठी चकमक! 3 महिला नक्षलवाद्यांसह 4 जणांचा खात्मा; शोधमोहिम सुरु

पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच काही नक्षलवादी जखमी होऊन जंगलात लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी: गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठ्या चकमकी पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी तीन महिला आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशातील बालाघाट येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी तीन महिला आहेत.   कान्हा किसली राष्ट्रीय उद्यानातील मुक्की परिसरात ही चकमक घडली.  पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच काही नक्षलवादी जखमी होऊन जंगलात लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

 ही चकमक पोलिसांसाठी एक मोठे यश आहे   ठार झालेल्या तीन नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.   त्या सर्वांची ओळख आशा, प्रमिला आणि करिश्मा अशी झाली आहे, त्या कान्हा भोरंडिओ दलाच्या सक्रिय सदस्या आहेत. चौथ्या नक्षलवाद्याचे नाव अद्याप समजलेले नाही.या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.  नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिस सतत मोहिमा राबवत आहेत.

( नक्की वाचा :  KDMC News : राज्यात संघर्ष पण डोंबिवलीत एकत्र, ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये एकमत! प्रकरण काय? )

ठाणे गढी येथील सूपखार वन रेंजरच्या रौंडा वन छावणीजवळ हॉकफोर्स आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या काळात तीन कट्टर नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. या तीन महिला नक्षलवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक 303 रायफल आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, जे घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा पोलिस दलासह 12हून अधिक पथके जंगलात शोध मोहीम राबवत आहेत.