मुलीच्या इन्सुलिनसाठीही पैसे नाहीत... व्यावसायिकाने फेसबुकवर Video बनवला आणि स्वतःवर गोळ्या झाडल्या!

Facebook live tragedy: व्यावसायिकाने सांगितले की, त्याच्याकडे मुलीसाठी इन्सुलिनचे इंजेक्शन विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Facebook live tragedy: फेसबुक लाईव्ह पाहून कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना फोन केला.
मुंबई:

Facebook live tragedy: एकदा परिस्थिती बिघडली की काहीही सूचत नाही. विशेषत: कर्जाच्या चक्रात अडकलेला व्यक्ती निराश अवस्थेत भलंतच पाऊल उचलण्याचाही धोका असतो. एका कर्जबाजारी रिअल इस्टेट व्यावसायिकानंही तेचत केलं.  व्यावसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली होती. 

व्यावसायिकाने सांगितले की, त्याच्याकडे मुलीसाठी इन्सुलिनचे इंजेक्शन विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत. त्याने गहिवरलेल्या आवाजात मुख्यमंत्री योगी, पंतप्रधान मोदी, मोठे उद्योगपती आणि सेलिब्रिटींना आपल्या कुटुंबासाठी मदत करण्याची विनंती केली. कर्जामुळे तो इतका त्रस्त होता की त्याला जीव देण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही.

(नक्की वाचा : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, कुलगुरुंवर केला गंभीर आरोप )
 

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.  या व्यावसायिकाने स्वत:च्याच कार्यालयात गार्डच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यावसायिकावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे तो गेल्या अडीच वर्षांपासून मानसिक तणावात होता. ही माहिती त्याने आपल्या फेसबुक लाईव्ह दरम्यान दिली. 

फेसबुक लाईव्ह पाहून कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. ते त्याच्या कार्यालयाकडे धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कुटुंब तिथे पोहोचेपर्यंत त्याने गार्डच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.

Advertisement

(नक्की वाचा: Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा माल )
 

या संपूर्ण प्रकरणावर लखनौ पोलिसांचे ADCP पंकज सिंह यांनी निवेदन केले आहे. त्यांच्या निवेदनानुसार, रिअल इस्टेट व्यावसायिकाने गार्डच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कर्जात बुडालेल्या अवस्थेत तो गेल्या काही वर्षांपासून त्रस्त होता. आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होऊन त्याने हे पाऊल उचलले.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article