आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) हे सध्याच्या तंत्रज्ञानाचा परवलीचा शब्द ठरत आहे. AI वर आधारित वेगवेगळ्या टुल्समध्ये रोजची कामं ही अधिक सोपी आणि अचूक होत आहेत. पण, त्याचा गैरवापर देखील केला जात आहे. OpenAI चे लोकप्रिय AI टूल ChatGPT च्या मदतीनं बनावट आधार कार्ड तयार करत असल्याचं उघड झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नव्या GPT4० मॉडेलमध्ये फोटो अधिक चांगले करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीय. हे फिचर्स गेल्याच आठवड्यात सुरु झालं असून युझर्समध्ये कमालीचं लोकप्रिय झालं आहे. त्याच्या मदतीनं युझर्सनं 70 कोटींपेक्षा जास्त फोटो तयार करण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : Liang Wenfeng शिक्षकाच्या मुलानं उडवली अमेरिकेची झोप! AI क्रांती करणारा DeepSeek निर्माता कोण आहे? )
आपल्या देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचं ओळखपत्र आहे. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या माध्यमातून आधार कार्ड नागरिकांना दिले जातात. नागरिकांनी दिलेली बायोमेट्रिक आणि भौगोलिक माहितीच्या आधारावर हे आधार कार्ड तयार केले जाते. पण, हेच आधार कार्ड ChatGPT च्या माध्यमातून तयार होत असल्यानं खळबळ उडाली आहे.
सोशल मीडिया नेटवर्क X वर याबाबतची उदाहरणं युझर्सनं शेअर केली आहेत.
AI च्या मदतीनं तयार करण्यात आलेले फेक आधार कार्ड आणि खरे आधार कार्ड यामधील फरक शोधणे अवघड आहे. फेक आधार कार्डवरील जन्मतारीख, फोटो ही सर्व माहिती देखील अस्सल आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर युझर्समध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालंय. ChatGPT ला ही माहिती कशी मिळाली? हे प्रकार करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? हा प्रश्न विचारला जात आहे.