'15 मिनिटांमध्ये परत येतो' CBI च्या बोगस गँगनं HDFC च्या खात्यातून गायब केले 85 लाख रुपये

Fraud CBI Officier : 'स्पेशल 26' या हिंदी चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याची गँग CBI अधिकारी असल्याचा दावा करत लोकांची संपत्ती लुटत असतात. याच प्रकारची घटना प्रयत्यक्षात देखील घडली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
या गँगमध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप पीडित व्यक्तीनं केलाय.
मुंबई:

Fraud CBI Officier : 'स्पेशल 26' या हिंदी चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याची गँग CBI अधिकारी असल्याचा दावा करत लोकांची संपत्ती लुटत असतात. याच प्रकारची घटना प्रयत्यक्षात देखील घडली आहे. यामध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची एका गटानं 85 लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार या गँगनं सीबीआय, सीमा शुल्क, नारकोटिक्स आणि आयकर अधिकारी असल्याचं भासवत स्काईपच्या माध्यमातून या अधिकाऱ्याच्या HDFC बँकेच्या खात्यातून 85 लाख रुपये गायब केले आहेत.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि दिल्लीमध्ये या प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आलीय. विशाखापट्टणममध्ये दाखल केलेल्या FIR नुसार या गटानं 'राणा गारमेंट्स' द्वारा चालवण्यात येणाऱ्या एचडीएफसी अकाऊंटमध्ये 85 लाख ट्रान्सफर करण्यास पीडित व्यक्तीला भाग पाडलं. राणा गारमेंट्सचं दिल्लीतील एचडीएफसी बँकेच्या उत्तम नगर शाखेत अकाऊंट आहे.  उत्तम नगर शाखेनं देखील या प्रकरणात फसवणुकीची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केलीय, अशी माहिती या सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं NDTV ला दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जर्मनीमध्ये असोसिएट जनरल मॅनेजर म्हणून काम केलेल्या या 57 वर्षांच्या पीडित व्यक्तीनं याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'माझ्या नोकरीचे 3 वर्ष बाकी होते. पण, मुलाला विदेशातील कॉलेजमध्ये शिक्षण घ्याचं आहे. त्याची तयारी करण्यासाठी  मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 2 मे रोजी मला माझ्या स्वेच्छानिवृत्तीची रक्कम मिळाली. पण, 14 मे रोजी या गटानं मला त्यांच्या खात्यात 85 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं. माझ्या पैशांची चौकशी केल्यानंतर ते परत दिले जातील, असं या गँगनं सांगितलं. या प्रोसेससाठी 15 मिनिटांचा वेळ लागेल. आम्ही 15 मिनिटात परत येतो, असं या गँगनं सांगितल्याची माहिती पीडित व्यक्तीनं दिली. 

( नक्की वाचा : तोतया CBI अधिकाऱ्यांकडून भाजप नेत्याच्या पत्नीची फसवणूक, कारवाई रोखण्यासाठी पैसे पाठवले अन्... )
 

बँक कर्मचाऱ्याचा सहभाग?

विशाखपट्टणम बँकेतील काही जण या गँगमध्ये सहभागी असू शकतात, असा आरोप पीडित सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं केलाय. त्यांना माझ्या खात्याबद्दल सर्व माहिती होती. इतकंच नाही तर त्यांना मला मिळणारी नेमकी रक्कम देखील माहिती होती. या गटानं जवळच्या एचडीएफसी बँकेत जाऊन चेकनं ही रक्कम जमा करण्यास मला सांगितलं होतं,' असं त्यांनी NDTV ला सांगितलं. 

Advertisement

सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'एचडीएफसी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार बँक गुन्हे शाखेला सहकार्य करत आहे. मी दिल्ली पोलिसांकडं उत्तम नगर शाखेतील राणा गारमेंट्सच्या खात्याची तक्रार केली. त्यानंतर दिल्ली पोलीस गारमेंट्सनं दिलेल्या पत्त्यावर गेले त्यावेळी त्यांना तिथं दुसरीच कंपनी असल्याचं त्यांना आढळलं. राणा गारमेंट्सच्या मालकाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. 

( नक्की वाचा : शेअर मार्केट ट्रेडिंगच्या लिंकवर केले क्लिक आणि बसला लाखो रुपयांचा फटका )
 

2 दिवस चौकशी

या प्रकरणातील एफआयआरनुसार 'सेवेच्छानिवृत्तनंतर या अधिकाऱ्याच्याच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यानंतर त्यांना 'डीसीपी सायबर क्राईम बलसिंह राजपूत' हे नाव धारण केलेल्या एका व्यक्तीचा फोन आला. त्यानं या सेवानिवृ्त्त अधिकाऱ्याचं नाव नारकोटिक्स आणि मनी लॉन्ड्रिंगच्या अनेक प्रकरणात आल्याचं सांगितलं. 

Advertisement

नकली डीसीपीनं त्याच्या नकली बॉसशी काही वेळ बोलणी केली. त्यानंतर त्यांनी मला तू निर्दोष दिसत असल्याचं सांगितलं. आम्हाला सध्या 85 लाख रुपये दे. पोलिसांना काही चुकीचं आढळलं नाही तर ते पैसे मला परत मिळतील. या प्रकरणात त्यांनी स्काईपवरुन माझी दोन दिवस चौकशी केली. त्यांनी मला घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. तसंच कुणालाही फोन करु दिला नाही. 

राणा गारमेंट्सच्या वेवेगळ्या बँकेतील 105 खात्यांमध्ये हे पैसे नंतर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. कोणत्या खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेत याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली नसल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. 
 

Advertisement