घर तिथे शौचालय आता गावोगावी आहेत. हगणदारी मुक्त गाव ही संकल्पना यशस्वी पणे राबवली गेली आहे. असं असतानाही गावातले काही महाभाग अजून ही बाहेरच शौचास जातात. त्यामुळे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेचे तिन तेरा अनेक ठिकाणी वाजलेले दिसतात. या लोकांना यावरून हटकले तरी त्यांचा राग अनावर होतो. आपणच शहाणे या अविर्भावात ते वावरतात. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री इथे घडली आहे. इथं झालेला वाद इतका टोकाला गेली की गावातले सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना साक्री तालुक्यातल्या दुसाने गावात घडली आहे. या गावात भगवंत खैरनार यांचे शेत आहे. या गावात राहुल गांगुर्डे आणि समाधान गांगुर्डे हे ही राहातात. यांचे नातेवाईक खैरनार यांच्या शेतात शौचास बसले होते. हे खैरनार यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी शौचास बसलेल्यांना हटकले. इथं शौचास बसू नका असे फटकारले. त्यानंतर त्यांना हुसकावून लावले. गावात आपला अपमान झाला असं त्यांना वाटले.
याबाबतची तक्रार त्य़ांनी राहुल आणि समाधान गांगुर्डे यांच्याकडे केली. त्यांनाही या गोष्टीचा राग आला. त्यांनी शेत मालक भगवंत खैरनार यांना गाठले. त्यानंतर त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत भगवंत खैरनार हे जबर जखमी झाले आहे. आपल्या नातेवाईकांना का हटकले अशी विचारणा करत गांगुर्डे यांनी मारहाण केली.
ट्रेंडिंग बातमी - अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?
भगवंत खैरनार यांच्या हाताला आणि पायाला या मारहाणीत जबर मार लागला आहे. या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या खैरनार यांना ताताडीने धुळ्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी शेतकऱ्याच्या जबाबावरून दोघांविरोधात निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करूनही अद्यापही कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करत कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी शेतकऱ्याने केली आहे.