निवडणुकीपूर्वी घातपाताचा कट; छत्तीसगड सीमेवरील कारवाईत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करू शकतात. त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्तीसगड:

छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानांत झालेल्या जोरदार चकमकीत पाच नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची (Anti Naxalite operation) ओळख पटली असून यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या घातपाताचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच अग्निशस्त्र हस्तगत केले आहे. जया उर्फ भुरी पदा (वय 31), वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी उर्फ दसरू तुलावी (वय 65), देवे उर्फ रिता (वय 25), बसंत, सुखमती अशी मृत नक्षलवाद्यांची नावं आहेत. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये 21 ऑक्टोबरला पहाटे चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली. यावेळी एक पोलीस जवान कुमोद आत्राम हे जखमी झाले आहेत. त्यांना  हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढून नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा - जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय?

निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करू शकतात. त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलविरोधी कारवाईमध्ये एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आलं. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.