Dirty Teacher : मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिकेनं 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर शारीरिक अत्याचार केल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी चांगलंच गाजलं होतं. अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास कथितपणे मदत करणाऱ्या महिलेला दादर पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला पश्चिम बंगालमध्ये गेली होती. तिथून तिला अटक करण्यात आली आहे. या महिलेनं मुलाला नैराश्याच्या गोळ्यांची शिफारस केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या या शिक्षिकेला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अंतर्गत जूनच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हा दाखल झाला होता. पण, त्यानंतर तिला 22 जुलै रोजी जमीन मंजूर करण्यात आला आहे.
"सुरुवातीला, शिक्षिकेला मदत करणारी महिला परदेशी गेली असावी असे आम्हाला वाटले होते. परंतु, नंतर आम्ही तिचा पश्चिम बंगालमध्ये शोध घेतला," असे दादर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे.
( नक्की वाचा : Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )
या महिलेने सुरुवातीला पश्चिम बंगालमधील न्यायालयात धाव घेतली होती, ज्याने तिला अंतरिम जामीन मंजूर केला आणि तिला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले. 23 जुलै रोजी तिने शहरातील सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले आणि तिला 6 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर मंगळवारी तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
"ही महिला 11 वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला भेटली होती आणि त्याला त्याच्या शिक्षिकेला भेटण्यासाठी प्रवृत्त केले होते, असे म्हटले होते की अशा गोष्टी आजकल सामान्य आहेत. तिने मुलासाठी 'डॅक्सिड 50' (Daxid 50) या अँटीडिप्रेसंटची (antidepressant) शिफारस देखील केली होती," असे अधिकाऱ्याने सांगितले.
विद्यार्थ्यावर शिक्षिकेने तिच्या सेडान कारमध्ये आणि नंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक समारंभासाठी डान्स ग्रुप तयार करताना ही शिक्षिका त्या विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, शिक्षिकेने जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
पोलिस सूत्रांनुसार, तिने विद्यार्थ्याला असेही सांगितले की, शिक्षिका आणि तो एकमेकांसाठीच बनले आहेत. त्यानंतर या शिक्षिकेने तिच्या डॉक्टर मैत्रिणीची मदत घेतली. डॉक्टर मैत्रिणीच्या फोन कॉलनंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. महिलेने मुलाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्याचं टेन्शन वाढलं होतं. त्यावेळी तिने त्याला काही वेदनाक्षमक गोळ्या देखील दिल्या.