Ghaziabad Murder : दिल्ली जवळच्या गाझीयाबादमधील एका पॉश सोसायटीमध्ये मंगळवारी (14 ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली. येथील एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं त्याच्या पत्नीला घरामध्ये 11 वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत गोळ्या घालून ठार मारले. या घटनेनंतर आरोपी फरार झालाय. ही घटना घडली त्यावेळी त्याची दुसरी मुलगी शाळेत गेली होती.
नेमकं काय घडलं?
गाझियाबादमधील विकास आणि रुबी या पत्नीवर मोदीनगर पोलीस स्टेशनमध्ये गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे. विकास काही काम करत नव्हता. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. विकास दोन-दोन महिन्यांसाठी घरातून गायब व्हायचा. याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद व्हायचा. मंगळवारी सकाळीही विकासने पासपोर्ट मागितला, तेव्हा याच कारणामुळे वाद झाला. संतापाने पेटलेल्या विकासने रिव्हॉल्व्हरने रुबीला गोळी मारली. घटनेच्या वेळी 11 वर्षांची मुलगी तिथेच होती, दुसरी मुलगी शाळेत गेली होती. रिव्हॉल्व्हर परवानाधारक होतं की अवैध, हे अद्याप कळू शकलेले नाही.
( नक्की वाचा : Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं? )
या प्रकरणात शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि रुबी एक-एक वर्षांपासून सोसायटीत राहत होते. त्यांचा फ्लॅट स्वतःचा होता. पोलिसांनुसार, काही काळापूर्वी रुबीच्या भावाचीही हत्या झाली होती. विकास आणि रुबी त्यांच्या कुटुंबापासून आणि शेजाऱ्यांपासून अलिप्त राहत होते. दोघांशी कोणतीही बातचीत होत नव्हती, असे सोसायटीतील लोकांमी सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी रुबीच्या भावाचीही हत्या झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर रुबीची आई (मुलींची आजी) मोदीनगरहून घटनास्थळी पोहोचली आणि मुलींना सोबत घेऊन गेली.
पोलिसांनी तपास सुरू केला
विकासने ज्या हत्याराने गोळी चालवली, तो परवानाधारक होता की अवैध, याची चौकशी केली जात आहे. रुबीचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) केले जात आहे. सर्वात दुःखद बाब म्हणजे आईचा मृत्यू झाला आहे आणि वडील जेलमध्ये जातील. अशा परिस्थितीत, मुलींच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.