गुजरात एटीएसने (ATS) अल-कायदाच्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. शिवाय चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. या अटकेमुळे एक मोठा कट उधळण्यात आला आहे. एटीएसने यातील तीन दहशतवाद्यांना गुजरातमधून तर एका दहशतवाद्याला दुसऱ्या राज्यातून अटक केली आहे. गुजरात एटीएसचे हे मोठे यश मानले जाते. भारतात मोठा घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. मात्र हा डाव आता उधळला गेला आहे.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघेही अल-कायदाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि काही संशयास्पद ॲप्सद्वारे अल-कायदाची विचारसरणी पसरवण्यात सक्रिय होते. गुजरात एटीएसने या चौघांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी करत आहे. सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली होती. मात्र त्या आधीच त्यांना एटीएसने पकडले आहे.
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही दीर्घकाळापासून अल-कायदा मॉडेलशी जोडलेले होते. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. काही ग्रुप्समध्येही सक्रिय होते. तपासादरम्यान, एटीएस टीमला असे आढळून आले की हे चारही जण गुजरातमध्ये होणाऱ्या संभाव्य दहशतवादी कारवायांबद्दल सतत चर्चा करत होते. याच संदर्भात त्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसला त्यांच्या काही सोशल मीडिया हँडल्स आणि चॅट्स देखील सापडले आहेत.