चाकूने भोसकले, आतडे कापले, नंतर हवेत भिरकावले.. दोन भावांनी केली आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या

Gujarat Murder case : दोन सख्या भावानं एका व्यक्तीची निर्घृण पद्धतीनं हत्या केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Gujarat Murder case : दोन सख्या भावानं एका व्यक्तीची निर्घृण पद्धतीनं हत्या केली आहे. हत्या केलेली व्यक्ती त्यांच्या आईचा कथित प्रियकर होता. त्यानी ज्या पद्धतीनं ही हत्या केली ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

गुजरातमधील गांधीनगरमध्ये हे धक्कादायक प्रकरण घडलं आहे. गुजरात पोलिसांनी दोन सख्या भावाला अटक केली आहे. त्यांनी रतनजी ठाकोर (वय 53) यांची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे आपल्या आईशी संबंध होते. त्यामुळे आपल्या मृत वडिलांचा अपमान होत आहे, अशी दोन्ही आरोपींची समजूत होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधीनगर जिल्ह्यात 26 जानेवारी रोजी ही घटना घडली. मृत व्यक्ती ही व्यवसायानं गवंडी काम करत असे. तो त्याच्या प्रेयसीसोबत एका घराचं काम करत असताना त्याची हत्या झाली. 

संजय ठाकोर (वय 27), जयेश ठाकोर (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांनी दिवसाढवळ्या रतनजीवर लोखंडाच्या रॉडनं हल्ला केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पोटात अनेक वेळा चाकूनं भोसकलं. त्यामुळे पीडित व्यक्तीचे आतडे बाहेर आली. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींचं यानंतरही समाधान झालं नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : 6 वर्षांपूर्वी केली शेजारच्या महिलेची हत्या, जामिनावर बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्यासह सासूला संपवलं! )
 

आरोपींनी मृत व्यक्तीचे आतडे बाहेर काढले. ते हवेत भिरकावले आणि त्याचे तुकडे-तुकडे केले. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना हे कृत्य पाहून मोठा धक्का बसला. काही मजूरांनी पीडिताला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. 

मृत व्यक्तीचा मुलगा अजयनं दिलेल्या माहितीनुसीार आरोपींनी त्यांच्या वडिलांना यापूर्वीही त्यांच्या आईपासून वेगळे राहण्याचा इशारा दिला होता. या विषयावर त्यांच्यात अनेकदा भांडण झालं होतं. या वादावर पंचायत देखील झाली. पण, काहीही तोडगा निघाला नाही. या घटनेनंतर आरोपी मोटार सायकलवरुन पळून गेले होते. पण, पोलिसांनी त्यांच्या लोकेशनच्या मदतीनं त्यांना अटक केली. 

Advertisement