Gujarat Triple Murder: ज्या व्यक्तीवर जंगलाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी होती, त्याच एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबाची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह निवासस्थानाच्या परिसरातील खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
या तिहेरी हत्याकांडामागील कारण तपासले असता, आरोपीचे एका महिला सहकाऱ्यासोबत असलेले तब्बल चार वर्षांचे प्रेमसंबंध (Affair) हे प्राथमिक कारण असल्याचे उघड झाले आहे. ही धक्कादायक घटना गुजरात (Gujarat) राज्यातील आहे.
काय आहे प्रकरण?
भावनगर (Bhavnagar) येथे सहायक वनसंरक्षक (ACF) म्हणून कार्यरत असलेला शैलेश खांभला (39) याला या गुन्ह्यासाठी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये खांभलाची ओळख वन विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याशी झाली. त्यांची मैत्री लवकरच प्रेमसंबंधात बदलली.
पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्याची चौकशी केली आहे, मात्र या तिहेरी हत्येमध्ये तिचा थेट सहभाग आहे किंवा नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
( नक्की वाचा : D-Mart News : डी-मार्टचा कर्मचारीच निघाला 'चोर'; बारकोड स्कॅन होताच किंमत व्हायची कमी, काय आहे घोटाळा? )
सुट्टीतील कुटुंब अचानक बेपत्ता
आरोपी शैलेश खांभला याची नुकतीच भावनगर येथे बदली झाली होती. त्याची पत्नी, 40 वर्षांची नयना, 13 वर्षांची मुलगी प्रिथा आणि 9 वर्षांचा मुलगा भाव्य हे सुरतमध्ये (Surat) राहत होते. ते काही दिवसांच्या सुट्टीसाठी भावनगरला आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ते रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
सुरक्षा रक्षकावर खोटा आरोप
आरोपी खांभला याने 5 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. यात त्याने दावा केला की, त्याची पत्नी आणि मुले एका ऑटोरिक्षातून (Auto-rickshaw) निघून गेल्याचे त्याच्या सुरक्षा रक्षकाने पाहिले. मात्र, सुरक्षा रक्षकाने खांभलाचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरवला.
कुटुंब बेपत्ता असतानाचे खांभलाचे 'वर्तन' आणि त्याच्या चेहऱ्यावरील 'काळजीचा अभाव' यामुळे पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय आला आणि त्यांनी तपास अधिक खोलवर सुरू केला.
( नक्की वाचा : Dubai Air Show: दुबई एअर शोमध्ये तेजस फायटर जेट क्रॅश; पायलटचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा Exclusive Video )
खड्डे खोदून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न
खांभलाच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली असता, तो कनिष्ठ अधिकारी गिरीश वाणिया याच्या सतत संपर्कात असल्याचे आढळले. आरोपीने वाणियाला कचरा टाकण्यासाठी घरामागे दोन खड्डे खोदण्यास सांगितले आणि वाणियाने नोव्हेंबर 2 रोजी ते खड्डे खोदले.
चार दिवसांनंतर, म्हणजेच हत्येनंतर, खांभलाने वाणियाला फोन करून खड्डे बुजवण्यासाठी डंपर (dumper truck) मागवला. एका खड्ड्यात 'नीलगाय' पडल्यामुळे तो बुजवायचा आहे, असे खोटे कारण त्याने दिले.
कसा झाला गुन्हा उघड?
पोलिसांनी या संशयास्पद खड्ड्यांची तपासणी केली असता, नोव्हेंबर 16 रोजी खांभलाच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह या खड्ड्यांमधून बाहेर काढले गेले. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने शैलेश खांभला याला अटक केली.
चौकशीदरम्यान खांभलाने त्याचा गुन्हा कबूल केला आणि ही हत्या पूर्वनियोजित (pre-planned) असल्याचेही मान्य केले.
'पत्नी सोडून गेली' असा रचला बनाव
गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने हत्येनंतर आपल्या पत्नीच्या फोनवरून स्वतःला एक मेसेज (message) पाठवला. यात तिने आपण दुसऱ्या कोणासोबत राहण्यासाठी जात असल्याचे लिहिले होते. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने लगेच तो फोन 'एअरप्लेन मोड'वर (airplane mode) टाकून दिला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, वैवाहिक वाद हे या गुन्ह्याचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्नी आणि मुलांना उशीने (pillow) गुदमरून मारण्यात आले होते. पत्नी आपल्या सासरच्या मंडळींसोबत सुरतमध्ये राहण्यास तयार नव्हती. भावनगर येथे एकत्र राहण्याचा तिचा आग्रह होता, ज्याला खांभलाचा तीव्र विरोध होता, असे त्याने पोलिसांना सांगितले.