फेसबुकवरील प्रेम मैत्री किती खरी आहे? इन्स्ट किंवा फेसबुकवरील मैत्री (Facebook Friendship) किंवा प्रेमाला किती महत्त्व द्यावं? तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल इतकं महत्त्व याला देण्याची गरज आहे का? हे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. कारण, हरियाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसची कार्यकर्ता हिमानी नरवालची नृशंस पद्धतीनं हत्या (Himani Narwal Murder Case) करणारा सचिन तिचा फेसबुक मित्र होता. हिमानी जवळपास दीड वर्षांपूर्वी दोन वर्षांचा बाप असलेल्या सचिनला फेसबुकवर भेटली. त्यानंतर पाहता-पाहता ही मैत्री इतकी वाढली की तो हिमानीच्या घरी देखील येत होता.
सचिन बहुतेक काळ रोहतकमधील हिमानीच्या घरीच राहत होता. त्याला हिमानीचा कथित बॉयफ्रेंड म्हंटले जात आहे. त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणांमुळे वाद झाला. त्यानंतर सचिननं मोबाईल चार्जरच्या वायरनं हिमानीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन रोहतक जिल्ह्यातल्या सांपला बस स्टँडवर फेकून दिला. या घटनेमुळे फेसबुकवरील प्रेमातून झालेल्या हत्येच्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
23 वर्षांच्या तरुणीची हत्या
महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये महेश राव या आरोपीनं सप्टेंबर 2024 मध्ये त्याची 23 वर्षांची गर्लफ्रेंड प्रियाची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात पुरला होता. प्रिया बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 25 दिवसांनी मुलीचा मृतदेह शोधून काढला होता.
प्रियाची हत्या तिचा प्रियकर महेशनं केल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं. त्यांची फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये लग्नावरुन मोठं भांडण झाले होते. त्यानंतर महेशनं प्रियाला ठार मारले आणि तिचा मृतदेह जंगलात पुरला होता.
( नक्की वाचा : बोगस सातबारा, NA... 65 इमारतींमधील रहिवाशांचीच नाही तर बड्या सरकारी कार्यालयाचीही फसवणूक )
लिव्ह इन पार्टरनरचा मृतदेह जाळला
11 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईच्या मीना करणचा अर्धवट जळालेला मृतदेह उत्तर प्रदेशातील धुमरी गावाजवळ सापडला होता. तिची हत्या करणारा देखील फेसबुक ब्रेंड आणि बॉयफ्रेंडच होता. माहितीनुसार, मीनाची मैत्री जैथरा या मुलाबरोबर झाली होती. त्यानंतर हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. ती जैथरावर लग्नासाठी दबाव टाकत होती. आपलं ऐकलं नाही तर खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी तिनं दिली होती.
त्यानंतर आरोपीनं मीनाला ऐटामध्ये नेलं आणि तिची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलं होतं.
फेसबुकवर प्रेम, बॉयफ्रेंडनं केले 17 तुकडे
जुलै 2024 मध्ये छत्तीसगडच्या कोरबामध्ये एका व्यक्तीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. त्याच्या मृतदेहाचे 17 तुकडे एका पोत्यात भरुन ते कचराकुंडीत फेकून देण्यात आले होते. ही हत्या देखील फेसबुक फ्रेंडनंच केली होती.
त्या मुलीची मुलाशी फेसबुकवरच ओळख झाली आणि नंतर प्रेम झालं. त्यानंतर तो मुलगा सौदी अरेबि्याला गेला. तो तिथून गर्लफ्रेंडला भेटवस्तू पाठवत होता. बॉयफ्रेंडनं नोकरीमध्ये कमावलेला पैसा लुबाडल्यानंतर मुलीनं त्याला सौदीहून परत बोलावलं आणि त्याची हत्या केली.