Crime News: बड्या उद्योगपतीची निर्घृण हत्या! नातवाने 73 वेळा वार करुन संपवलं; धक्कादायक कारण समोर

राव हे वेलजन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) होते. सहा फेब्रुवारी रोजी ही भयंकर घटना घडली. कीर्ती तेजा (वय, 28) असे हल्ला करणाऱ्या नातवाचे नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

हैदराबाद: संपत्तीच्या वादातून प्रसिद्ध उद्योगपतीची नातवानेच सपासप वार करुन निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  वेलमती चंद्रशेखर जनार्दन राव असे या उद्योगपतीचे नाव असून ते वेलजन उद्योग समुहाचे अध्यक्ष होते. हैदराबादच्या पंजागुट्टा परिसरात घडलेल्या या भयंकर घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हल्लेखोर आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हैदराबादमधील एका 86 वर्षीय उद्योगपती  चंद्रशेखर जनार्दन राव यांची त्यांच्या नातवाने मालमत्तेच्या वादातून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  राव हे वेलजन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) होते. सहा फेब्रुवारी रोजी ही भयंकर घटना घडली. कीर्ती तेजा (वय, 28) असे हल्ला करणाऱ्या नातवाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शहराच्या दुसऱ्या भागात राहणारे तेजा आणि त्याची आई गुरुवारी सोमाजीगुडा येथे  चंद्रशेखर जनार्दन राव यांच्या घरी आले होते. यावेळी तेजाची आई कॉफी घेण्यासाठी गेली तेव्हा नातू तेजा आणि आजोबा चंद्रशेखर राव यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाला. याच वादातून नातवाने आजोबांवर चाकूने हल्ला केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Don Ashwin Naik: 'राज ठाकरे- उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं...', मुंबईतील कुख्यात गँगस्टरची इच्छा

आरोपीने आजोबांवर तब्बल 73 वेळा चाकूने वार केले. यावेळी आरोपीच्या आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावरही चाकूने वार केले. आरोपीची आई जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच  शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी नुकताच अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी पूर्ण करून हैदराबादला परतला होता.

Advertisement

दरम्यान,  वेलजानच्या वेबसाइटनुसार, 1965 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी जहाजबांधणी, ऊर्जा, मोबाईल आणि औद्योगिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांसाठी संपूर्ण उपाय प्रदान करण्यात अग्रेसर आहे.