Infosys Engineer : इन्फोसिस इंजिनिअरनं शौचालयातील महिलेचा बनवला Video, भयंकर प्रकार पाहून सर्वच हादरले

Infosys Engineer: बंगळूरुमधील इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेकी) कार्यालयाच्या शौचालयात एका महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Infosys Engineer: नागेश स्वप्नील माळी असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
मुंबई:

Infosys Engineer: बंगळूरुमधील इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेकी) कार्यालयाच्या शौचालयात एका महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.इन्फोसिसमध्ये वरिष्ठ सहयोगी (senior associate) म्हणून काम करणारा नागेश स्वप्नील माळी याला सोमवारी संबंधित महिला कर्मचाऱ्याने रंगेहाथ पकडले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात संबंधित महिलेनं पोलिसांममध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे की, 'ती शौचालयात गेली त्यावेळी तिला तिच्या जवळच्या परिसरात संशयास्पद हालचाल दिसली आणि तिने पाहिले की नागेश तिचा व्हिडिओ बनवत होता. तिने तात्काळ आरडाओरडा केला, त्यानंतर इतर कर्मचारी घटनास्थळी धावले आणि माळीला पकडले. त्याच्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ फुटेज सापडले, जे नंतर मनुष्यबळ (Human Resources) कर्मचाऱ्यांनी महिलेच्या उपस्थितीत डिलीट केले.

( नक्की वाचा: Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )
 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एकमेव घटना नसण्याची शक्यता आहे आणि माळीने आणखी महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत का, याचा ते तपास करत आहेत. हटवलेली सामग्री परत मिळवण्यासाठी आणि त्याने यापूर्वीही असे काही केले आहे का, हे तपासण्यासाठी त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

अयोध्येमध्येही घडला होता प्रकार

दरम्यान, एप्रिलमध्ये अयोध्येत अशाच एका घटनेत, राम मंदिराशेजारील एका गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय कर्मचाऱ्याला एका महिलेला अंघोळ करताना चित्रित केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. वाराणसीहून आलेल्या त्या भाविक महिलेला एक सावली दिसली आणि छताच्या पत्र्यातून कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत असल्याचे तिने पाहिले.

Advertisement

( नक्की वाचा: Police Crime: पोलिसाचा माज, रिक्षाचालकाला जात विचारली, थुंकी चाटायला लावली! )
 

सौरभ तिवारी नावाच्या त्या व्यक्तीचा फोन जप्त करण्यात आला आणि पोलिसांना इतर महिला पाहुण्यांचेही अनेक व्हिडिओ सापडले होते.

Topics mentioned in this article