IPL Cricketer : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला गंभीर आरोपाखाली अटक, मैत्रिणीनेच केली होती तक्रार

IPL Player Shivalik Sharma News:  इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्माला (Shivalik Sharma) अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL Player Shivalik Sharma News:  इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्माला (Shivalik Sharma) पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. राजस्थान पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील जोधपूरच्या तरुणीनं शिवालिक शर्माच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती. याबाबत पीडत तरुणीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती फेब्रुवारी 2023 मध्ये गुजरातमधील बडोद्याला फिरायला आली होती. त्यावेळी तिची भेट शिवालिक शर्माशी झाली. त्यांच्यात हळू-हळू मैत्री झाली. तसंच फोनवरील संभाषणामध्ये ते दोघं एकमेकांच्या जवळ आले. 

दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी देखील एकमेकांची भेट घेतली. शिवालिकचे आई-वडिल ऑगस्ट 2023 मध्ये जोधपूरला आले होते. त्यावेळी दोघांच्या संमतीनं साखरपुडा झाला. शिवालीक साखरपुड्यानंतर जोधपूरमध्ये आला त्यावेळी त्यानं लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तरुणीनं केला आहे. ते दोघं राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी फिरले. पण, ऑगस्ट 2024 मध्ये शिवालिक आणि त्याच्या कुटुंबीयानं बडोद्याला बोलावलं होतं. त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी साखरपुडा मोडला. 

( नक्की वाचा : 13 वर्षांच्या मुलासोबत पळालेली शिक्षिका अखेर सापडली, पोलिसांना म्हणाली मी गर्भवती, माझ्या पोटात... )
 

त्यानंतर पीडित तरुणीनं जोधपूरमधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवालिकवर लग्नाचं आमिष दाखवून गैरकृत्य केल्याचा आरोप आहे.

कोण आहे शिवालिक शर्मा?

शिवालिक शर्मा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याचं प्रतिनिधित्व करतो. डावखुरा बॅटर असलेला शिवालिक 2016 मधील विनू मंकड अंडर 19 ट्रॉफी तसंच 2017 मधील कुचबिहार ट्रॉफीतील महत्त्वाच्या खेळीमुळे सर्वप्रथम चर्चेत आला होता. 

Advertisement

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : चांगल्या कामगिरीनंतरही बुमराहला बसणार धक्का, BCCI च्या मनात काय? )
 

2023 साली झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 114 रन्स केले होते. शिवालिकला आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सनं करारबद्ध केलं होतं. पण, त्याला एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 
 

Topics mentioned in this article