मंगेश जोशी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील बोढरे फाट्याजवळ महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनांची तपासणी दरम्यान ब्रेझा कारमधून कोट्यावधी रुपयांचे अंँफेटामाईन ड्रग्ज जप्त केले आहे. मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे चाळीसगाव मध्ये एकच खळबळ उडाली असून अंँफेटामाईन ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Crime News: बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, पायावर नाक घासायला लावलं; क्लासमधील मुलींचा वाद टोकाला पोहचला
चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोढरे फाट्याजवळ मध्यरात्री वाहनांची तपासणी करत असताना दिल्ली पासिंग असलेल्या ब्रेझा कारला पोलिसांनी थांबवून कारचालकाची चौकशी करत कारची तपासणी केली यात एक निळ्या रंगाची सुटकेस बॅग पोलिसांना आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता पॅकेटमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला. व यावरून महामार्ग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा असल्याने फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत कार मध्ये आढळलेल्या अमली पदार्थाची पाहणी केली. फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने या आपली पदार्थाची तपासणी केली असता कारमध्ये 39 किलो अंँफेटामाईन ड्रग्ज असल्याचे आढळून आले.
त्याची आंतरराष्ट्रीय बाजार भाव सुमारे 40 ते 50 कोटीच्या घरात असल्याचे समोर आले. याबाबत माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण हे देखील घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनद्वारे माहिती दिली. तसेच या ड्रग्स तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशय ही आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- Nashik News: विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहीरीत घेतली उडी, भयंकर कारण आलं समोर)
यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून अटक करण्यात आलेला आरोपीविरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.