जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आला आहे. अंबड येथील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार करण्यात आले. अत्याचार करताना तिचे व्हिडीओ ही काढण्यात आले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी आणि लग्नास नकारही देण्यात आला. हा सर्व प्रकार दुसरा तिसरा कुणी नाही तर एका पुढाऱ्याने केला आहे. हा पुढारी प्रहार संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर हा पुढारी फरार झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पीडित महिला ही आपल्या आई, वडिल आणि मुलांसह भाड्याने रूम घेऊन राहाते. ती अंबड शहरातील सुरंगे नगर परिसरात आहेत. त्याच वेळी तिची ओळख आरोपी मोहन मुंढे याच्या बरोबर झाली. हा मोहन प्रहार संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. नंतर एक दिवस आरोपीने त्या महिलेस सांगितले की तू मला खूप आवडतेस, तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे. मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून आरोपी मोहन मुंढे याने त्या महिलेला भूलवले. तिला लग्नाचा आमिष ही दाखवले.
महिलेने ही मोहन आपल्या बरोबर लग्न करेल असा विश्वास ठेवला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखून तो त्या महिलेवर वारंवार अत्याचार करत होता. पण महिलेनं त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र त्यावेळी मोहन मुंडे याने त्या महिले सोबत लग्न करण्यास नकार दिला. शिवाय आपल्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ शोषण मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. त्याच बरोबर तिला शिवीगाळ करत मुलांना आणि आई वडिलांना जीवे मारण्याचीही धमकी दिली.
ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यातील 'ही' पर्यटन स्थळं पुढील 3 महिने राहणार बंद
या सर्व घटनेनं ती पीडित महिला हादरली. तिने थेट अंबड पोलिस ठाणे गाठत मोहन मुंडे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून मोहन मुंडे याच्या विरुद्ध लग्नाचे आमिष दाखून महिलेवर वारंवार बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल केला. शिवाय महिलेचे अश्लील व्हिडीओ काढणे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देणे या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकारानंतर मोहन मुंडे फरार झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.