शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं पवित्र समजलं जातं. मात्र याच नात्याला डाग लावणारी घटना एका शाळेत घडली आहे. इथं शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच असं कृत्य केलं त्यामुळे संपुर्ण शाळेच शरमेनं मान खाली घालावी लागली आहे. याशाळेत शिकत असलेल्या 10 वीच्या विद्यार्थीनींना चक्क शर्ट काढण्याचं फर्मान केलं. त्यानंतर तुम्ही कसं घरी जाता तसं जावं असंही सुनावलं. यानंतर विद्यार्थिनींना धक्का बसला. ही बाब जेव्हा त्यांच्या पालकांना समजली त्यावेळी हे संपुर्ण प्रकरण समोर आले. या घटनेनंतर सगळ्या विद्यार्थिनी घाबरून गेल्या आहेत. झारखंडच्या धनबादमध्ये ही घटना घडली. संबधीत मुख्याध्यापिके विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी आता कुटुंबीय करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दहावी परीक्षे आधी शाळेचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी विद्यार्थीनी शाळेत 'पेन डे' साजरा करत होत्या. त्यावेळी त्या पेनच्या सहाय्याने एकमेकींच्या शर्टवर लिहीत होत्या. त्यामुळे मुलींचे शर्ट पेनच्या शाहीने रंगले होते. त्यातून शाळेचा शेवटचा दिवस मुली साजरा करत होत्या. तर पुढील वाटचाली बाबत आनंद व्यक्त करत होत्या. त्याच वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तिथे आल्या. त्यांना ही कृती आवडली नाही. परिक्षा तोंडावर असताना विद्यार्थींनीनी केलेली ही कृती त्यांच्या पचनी पडली नाही. त्याच वेळी त्यांनी विद्यार्थ्यांनीना फर्मान काढले.
ट्रेंडिंग बातमी - Crime news: शादी डॉट कॉमवर ओळख, लॉजवर शारीरिक संबंध , पुढे मात्र जे झालं ते...
पेन डे साजरा करत असलेल्या दहावीच्या मुलींना त्यांनी शर्ट काढायला लावले. त्यानंतर आता तुम्हाला जसं घरी जायचं आहे तसं जा. आम्हाला काही देणं घेणं नाही असं त्या मुख्याध्यापिकेने सुनावले. त्यानंतर त्या मुलींचे शर्ट काढू घेण्यात आले. त्यांच्याकडे केवळ ब्लेजर होते. ते ब्लेजर घावूनच मुलींना घरी जावे लागले. ज्या मुलींकडे एक्स्ट्रा शर्ट होते त्यांना शर्ट घालणे शक्य झाले. बाकीच्या मुली मात्र ब्लेजरवरच घरी गेल्या. घरी गेल्यनंतर मुलींनी ही गोष्टा आपल्या पालकांना सांगितली. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. शिवाय याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी माधवी मिश्रा यांनी तपास सुरू केला आहे. याबाबतची तक्रारही पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं माधवी मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्या मुख्याध्यापिकेने हे कृत्य केले आहे तिच्या विरोधात कडक कारवाई केली पाहीजे असं पालकांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शाळेत जावून चौकशी करेल. चौकशीत जे समोर येईल त्यांच्यावर कारवाई होईल. पेन डे झाल्यानंतर विद्यार्थीनींचे शर्ट खराब झाले होते. असे शर्ट घालून बाहेर गेलात तर शाळेच नाव खराब होईल. असा युक्तीवाद शाळेने केला. पण त्यामुली केवळ ब्लेजरवर बाहेर गेल्या यामुळे शाळेचं नाव मोठं झालं का अशा प्रश्न आता पालकांनी केला आहे.