Jyoti Malhotra Case : YouTuber ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कचं गंभीर कनेक्शन उलगडत आहेत. हिसार पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चार पाकिस्तानी गुप्तहेर एजंट्सविरुद्ध तपास सुरू केला आहे, जे ज्योतीच्या थेट संपर्कात होते सूत्रांनुसार, ज्योतीची या एजंट्सशी वन-टू-वन (थेट) चर्चा झाली होती आणि हे एजंट पाकिस्तानच्या इंटर-सर्विसेस इंटेलिजन्स (ISI) किंवा पाकिस्तानी सैन्यात कोणत्या पदावर आहेत, याचा पोलीस आता शोध घेत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्योतीला होती कल्पना
यापूर्वी ज्योती मल्होत्राला 16 मे 2025 रोजी हिसार पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. तिच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधून मिळालेल्या 12 टीबी डेटाच्या तपासणीत अनेक धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. या डेटामधून हे उघड झाले आहे की, ज्योतीला आपण ISI च्या लोकांशी बोलत आहोत याची पूर्ण कल्पना होती, तरीही ती कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या संपर्कात होती. या पुराव्यांच्या आधारे, पोलीस ज्योतीविरुद्ध ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या काही कलमांव्यतिरिक्त आणखी काही कलमे लावण्याचा विचार करत आहेत.
( नक्की वाचा : Yatri Doctor : कोण आहे यात्री डॉक्टर? पाकिस्तानी गुप्तहेर ज्योती मल्होत्राशी त्यांचे काय आहे कनेक्शन? )
पाकिस्तानमध्ये ज्योतीला VIP ट्रीटमेंट
आता मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, पोलीस ज्योती मल्होत्रा प्रकरणात आणखी काही कलमे जोडू शकतात. ज्योतीच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी (मनी ट्रेल) हरियाणा पोलीस इतर केंद्रीय एजन्सींची मदत घेऊ शकतात. आतापर्यंतच्या तपासात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीच्या ज्या एजंट्सची नावे समोर आली आहेत, त्यामध्ये दानिश, एहसान अली आणि शाहिद यांचा समावेश होता. ज्योतीला पाकिस्तानात जी VIP ट्रीटमेंट मिळाली त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानला भेट दिलेल्या एका स्कॉटिश यूट्यूबरने लाहोरमधील अनारकली बाजारात ज्योती मल्होत्राला पाहिले आणि तिच्यासोबत असलेली सुरक्षा पाहून त्याला धक्काच बसला. त्याने तो व्हिडिओ देखील आता शेअर केला आहे. लाहोरच्या अनारकली मार्केटमध्ये AK-47 घेऊन जे सुरक्षा कर्मचारी फिरत होते, ते कोणाच्या सांगण्यावरून सुरक्षा देत होते, याचाही तपास सध्या सुरू आहे.