इंजिनिअर अतुल सुभाषचं टोकाचं पाऊल, दोष कुणाचा? कंगना रनौतचा तर्क काय?

कंगनाच्या मते अतुल सुभाष यांची आत्महत्या ही खरोखरच धक्कादायक आहे. एका तरूण इंजिनिअरने अशा पद्धतीने पाऊल उचलणे हे कल्पना करण्या पलिकडचे आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

अतुल सुभाष या तरूण इंजिनिअरच्या आत्महत्येनं संपूर्ण देश हादरून गेला आहे. या आत्महत्येची चर्चा देशात सुरू आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून या तरूण इंजिनिअरनं आपलं जिवन संपवलं आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक दिड तासाचा व्हिडीओ बनवला आहे. शिवाय 40 पानाचं सुसाईड नोट ही लिहीली आहे. त्यानंतर पती पत्नीचे अधिकार याबाबत एक वेगळीच चर्चा देशात सुरू झाली आहे. या संवेदनशिल प्रकरणात आता भाजप खासदार आणि अभिनेत्री कंनगा रनौत यांनी उडी घेतली आहे. त्यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कंगनाच्या मते अतुल सुभाष यांची आत्महत्या ही खरोखरच धक्कादायक आहे. एका तरूण इंजिनिअरने अशा पद्धतीने पाऊल उचलणे हे कल्पना करण्या पलिकडचे आहे. पण एका चुकीच्या महिलेचे उदाहरण देवून, दररोज ज्या महिलांना छळलं जात आहे. त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात आहे हे आपण नाकारू शकत नाही असं त्या म्हणाल्या. शिवाय कंगना पुढे म्हणतात 99% लग्नात पुरूषांचाच दोष असतो. त्यामुळेच असे प्रकार होतात असंही त्या म्हणाल्या आहेत.      

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन

 अतुल सुभाष यांचा व्हिडीओ हा मन हेलावून टाकणारा आहे असंही कंगना सांगतात. आपल्या देशात लग्न ही एक परंपरा आहे. पण या परंपरेमध्ये ज्या वेळी पुरूषप्रधान संस्कृतीची घुसघोरी होते त्यावेळी असे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे लग्न या परंपरेत अडचणी येतात. त्यातूनच हे प्रकार घडतात असं ही त्या म्हणाल्या. अतुल यांच्याकडे करोडो रूपये मागितले जात होते. जे त्यांना देणं शक्य नव्हतं. त्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात होता तो चुकीचा होता. त्यामुळे याची दखल घेणे गरजेचे आहेत असंही त्या म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - महत्वाची खाती भाजपकडेच राहाणार? मित्रपक्षाकडील खाती ही खेचून घेण्याची तयारी?

अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मुलासाठी खास मेसेज लिहिला आहे. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्यासाठी मला माझा जीव द्यावा लागेल, याचा कधी विचार केला नव्हता. पण, दुर्दैवानं मी तुझ्यासाठी जीव देतोय. मला कधी-कधी एका त्रासाशिवाय तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुझा वापर मला ब्लॅकमेल  करण्यासाठी होत आहे. तुझ्या माध्यमातून माझ्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातोय. असं त्यांनी लिहीलं आहे. अतुलचे भाऊ विकास सुभाष यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुलचं लग्न 2019 साली झालं होतं. अतुलची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याला अनेक खोट्या आरोपांमध्ये अडकवलं होतं. त्यामुळे अतुल खूप त्रस्त होता. याच त्रासातून त्यानं जीव दिला. पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

Advertisement